सातारा : सातारा केमिस्ट नागरी सह. पतसंस्था मर्यादित या पतसंस्थेच्या नूतन कार्यालयाचे स्वमालकीच्या जागेत शनिवार दि. 9 मार्च रोजी सकाळी 11 वाजता उद्घाटन होत आहे. या आनंदाच्या क्षणी सातारकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित रहावे, असे आवाहन केमिस्ट पतसंस्थेचे चेअरमन अभय गरगटे व व्हाईस चेअरमन मुकुंद लोहिया यांनी आज सातारा येथील पत्रकार परिषदेत केले. यावेळी अखिल भारतीय केमिस्ट संघटनेच्या अध्यक्षपदी जगन्नाथराव शिंदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा संघटनेच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
सातारा नागरी केमिस्ट सह. पतसंस्थेला सातारा पतसंस्था फेडरेशनच्यावतीने गतवर्षी उत्कृष्ट पतसंस्थेचा पुरस्कार मिळाला होता. लेखा परिक्षणात अ वर्ग प्राप्त करणार्या या पतसंस्थेने 15 टक्के लाभांश सभासदांना दिला आहे. अवघ्या 12 तासांत कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर सुलभ कर्जपुरवठा तसेच वीज बिल भरणा केंद्र व इतर सुविधा या पतसंस्थेत निर्माण करण्यात आल्या आहेत. पोवई नाका येथील रामकृष्ण कॉलनीतील घोडके प्लाझा अपार्टमेंटमधील जागेत सध्या स्वमालकीचे पतसंस्थेचे कार्यालय होत आहे. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार्या या कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथराव शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण पाटील, सागर पाटील व नगराध्यक्षा माधवी कदम व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पतसंस्थेचे सर्व संचालक, मार्गदर्शक, सल्लागार समिती सदस्य तसेच व्यवस्थापक बाळकृष्ण साबळे यांनी कार्यक्रमाची जय्यत तयारी केली असून केमिस्ट नागरी पतसंस्थेच्या इतिहासात सुवर्णाक्षराने या सोहळ्याची नोंद होईल, त्याचे आम्ही साक्षीदार राहणार आहोत याचा अभिमान वाटत असल्याची भावना दिलीप गांधी, प्रकाश आंबेकर, नंदकुमार बेंद्रे, दिलीप दोशी यांनी व्यक्त केली आहे.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |