कोरेगाव : चार दिवसांपूर्वी अलंकार हॉटेल (मुगाव फाटा) परिसरातून अचानक गायब झालेल्या अलंकार हॉटेलचे मालक जोतीराम महादेव कदम (वय 42) यांचा मृतदेह आज पाडळी (सातारारोड) गावच्या हद्दीतील कॅनॉलमध्ये सडलेल्या अवस्थेत सापडल्यामुळे कोरेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर पाडळी गावच्या हद्दीत सर्व्हिस रस्त्याच्या कडेला जोतीराम कदम यांच्या मालकीची स्विफ्ट गाडी सलग तीन दिवस उभी असलेल्या स्थितीत मिळाल्याने जोतीराम कदम यांचा खून झाल्याची शक्यता पाडळी परिसरातून व्यक्त होत आहे. कोरेगाव पोलिसांचा तपासही त्याच दिशेने सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, 27 जुलै रोजी अलंकार हॉटेलचे मालक जोतीराम कदम हे त्यांच्या हॉटेल परिसरातून अचानक गायब झाल्याची लेखी तक्रार त्यांच्या पत्नी संध्या जोतीराम कदम यांनी कोरेगाव पोलीस स्टेशनला दिली होती. कोरेगाव पोलीस जोतीराम कदम यांचा गेली चार दिवस शोध घेत होते. आज दि. 30 रोजी दुपारी 1 च्या सुमारास पाडळी गावच्या हद्दीत एका रस्त्याच्या कडेला एक स्विफ्ट कार गेली चार दिवस बेवारस अवस्थेत असल्याची माहिती अज्ञात इसमाने कोरेगाव पोलीस स्टेशनला दिली. मिळालेल्या माहितीवरुन कोरेगाव पोलिसांनी संबंधित गाडीची पाहणी केली असता त्या गाडीच्या सीटवर रक्ताचे डाग आढळले. यानंतर अधिक पाहणी केली असता पाडळी गावच्या हद्दीत जरंडेश्वर पायथ्याला एका कॅनॉलमध्ये अलंकार हॉटेलचे मालक जोतीराम कदम यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. स्विफ्ट कारमधील रक्ताचे डाग आणि दूरवर डोंगराच्या पायथ्याला फेकून दिलेल्या सडलेल्या अवस्थेतील जोतीराम कदम यांच्या मृतदेहामुळे अज्ञात व्यक्तींनी जोतीराम यांचा खून केला असण्याची शक्यता कोरेगाव पोलिसांनी व्यक्त केली. परिसरातील नागरिकांनीही खुनाचाच संशय व्यक्त केला. अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण हत्याराने डोक्यात वार करुन, मारहाण करुन जोतीराम कदम यांचे प्रेत पाडळी गावच्या हद्दीत जरंडेश्वर डोंगराच्या पायथ्याला असणार्या कॅनॉलमध्ये टाकल्याची फिर्याद कोरेगाव पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |