07:18pm | Apr 03, 2020 |
सातारा : कोरोनामुळे सातारा जिल्ह्यातील मांढरदेव, शिखर-शिंगणापूर, पालीचा खंडोबा, वाईचा महागणपती या भक्ती स्थळांवर संक्रात आली असताना सातारा जिल्हा रुग्णालय ही दोन दिवसापासून ओस पडू लागले आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या ९० टक्के रुग्णांनी स्वतःहून डिस्चार्ज घेतल्यामुळे रुग्णालयातील वॉर्ड ओस पडले असल्याचे दिसून येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणूनखबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना मोफत देण्यात येणारे भोजन तात्पुरते बंद करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात केस पेपर काढण्यासाठी दररोज रांगाच्या रांगा लागत असत गेल्या १५ दिवसात मात्र अत्यंत अल्प रुग्णांनी केस पेपर काढले असल्याची नोंद झाल्यामुळे कोरोनाची अनेकांनी चांगलीच धास्ती घेतली असल्याचे दिसून येते.
सातारा जिल्हा रुग्णालयात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण विविध तपासण्या उपचार करून घेण्यासाठी येत असतात. सकाळी ९ वाजताच केसपेपर काढण्यासाठी रांगाच्या रांगा लागलेल्या असतात. जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या पाहता एकाच ठिकाणी चार रांगेतून केसपेपर देण्याची व्यवस्था जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने उपलब्ध करून दिली होती. सर्दी, थंडी, ताप ते गंभीर दुखापत अपघातात जखमी यासारख्या गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालयात सर्वतोपरी सहकार्य करण्याबरोबरच सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करून देण्यात येतात. वेळप्रसंगी अतिदक्षता विभाग विविध वार्डमध्ये त्यांना ऍडमिट करून घेतले जाते. सर्वसामान्यांचे रुग्णालय अशी ओळख असणाऱ्या जिल्हा रुग्णालय मात्र गेल्या दहा- पंधरा दिवसांपासून अत्यंत ओस पडले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कोरोनाच्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात दोन स्वतंत्र विलगीकरण कक्ष करण्यात आले आहेत. त्या कक्षात आतापर्यंत दोन जणांना दाखल करून त्यापैकी एकाला डिस्चार्ज दिला असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात अन्य आजारांनी दाखल असणाऱ्या रुग्णांवर त्याचा फार मोठा परिणाम झाला असल्याचे बोलण्यात येत आहे. सातत्याने जिल्हाधिकारी शेखर सिंग, जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर घाबरून जाऊ नका मात्र काळजी घ्या असे आवाहन करत असले तरी रुग्णांचा जीव मात्र टांगणीला लागला असल्यामुळे ९० टक्के रुग्णांनी स्वतःहूनच डिस्चार्ज घेतला असल्यामुळे जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड रुग्णाअभावी ओस पडले असल्याचे चित्र दिसून येत आहे. केसपेपर काढण्यासाठी ही आता पहिल्यासारखी गर्दी होत नसल्यामुळे जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या व्यक्तींनी कोरोनाची चांगलीच धास्ती घेतली असल्याचे दिसून येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणारी मोफत जेवन तात्पुरते बंद करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, सातारा शहर परिसरात असणारे कुरणेश्वर मंदिर, दत्त मंदिर, कुबेर गणेश विनायक मंदिर, कोटेश्वर मंदिरामध्ये भाविक अत्यंत तुरळक प्रमाणात पहायला मिळत आहेत. दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने गर्दी करू नका असे आवाहन केल्यामुळे मांढरदेव, शिखर-शिंगणापूर, पालीचा खंडोबा, वाईचा महागणपती येथे भाविकांनी जाण्याचे टाळले असल्यामुळे धार्मिक स्थळांवर संक्रात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |