सातारा : सातारा शहर परिसरातून 2 लाख 82 हजार रुपये किंमतीच्या तब्बल 9 दुचाकी चोरी केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने अभिजीत उर्फ राहूल राजाराम लोहार (रा.सोमवार पेठ, सातारा) याला अटक केली आहे. दरम्यान, संशयिताने आणखी काही दुचाकी चोरी केल्या असण्याची शक्यता असल्याने तक्रारदार यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहर परिसरातील एसटी स्टँड, राजवाडा स्टँड, सिव्हील रुग्णालय व कराड परिसरातून गेल्या काही दिवसात दुचाकी चोरींचे प्रमाण वाढले असून त्याप्रकरणी सातारा शहर, शाहूपुरी व तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. वारंवार दुचाकी चोरी होत असलेल्याने एलसीबीच्या पथकाने चोरट्याची माहिती घेतली असता अभिजीत उर्फ राहूल लोहार याचे नाव समोर आले. शुक्रवारी एलसीबीचे पोलिस सातारा एसटी स्टँड परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी संशयित एम एच 11 एव्ही 2763 या दुचाकीवरुन फिरत होता.
पोलिसांना संशयित राहूल लोहार याचा संशय आल्याने त्याला बाजूला घेवून चौकशी केली. प्राथमिक चौकशीमध्ये तो वापरत असलेली दुचाकी चोरीची असल्याचे समोर आले. एलसीबी विभागात आणल्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आणखी 8 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. संशयिताने त्या दुचाकीबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी चोरीच्या सर्व दुचाकी जप्त केल्या.
पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, फौजदार सागर गवसणे, शशिकांत मुसळे, पोलिस हवालदार विलास नागे, संजय पवार, ज्योतीराम बर्गे, मोहन नाचण, रविंद्र वाघमारे, योगेश पोळ, नितीन भोसले, संतोष जाधव, राजकुमार ननावरे, प्रवीण कडव, गणेश कचरे, मारुती अडागळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |