05:50pm | Sep 07, 2018 |
सातारा : राज्यातील पहिला खाजगी साखर कारखाना म्हणून देशभरात लौकिक पावलेला व फलटण तालुक्याचा एकेकाळी मानबिंदू असलेला न्यू फलटण शुगर वर्क्स लि. साखरवाडी, ता. फलटण सध्या शेतकर्यांच्या थकित ऊसबिलांमुळे चर्चेत आला आहे. याबाबत शेतकर्यांना कारखान्याच्या संचालकांसह तहसिलदार व प्रांत कार्यालयाचे उंबरे अनेक दिवसांपासून झिजवावे लागत आहेत. आज होईल, उद्या होईल या चर्चांमुळे येथील ऊस उत्पादक शेतकरी मात्र देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. मात्र, या सर्व प्रक्रियेमध्ये तालुक्यातीलच एका तथाकथित उद्योजकाच्या एन्ट्रीमुळे या सर्व प्रकरणात ट्विस्ट वाढला आहे.
गेल्या दहा महिन्यांपासून न्यू फलटण शुगर वर्क्सने शेतकर्यांची 51 कोटी 15 लाख 86 हजार 530 रुपये एवढी ऊस बिलाची रक्कम गतवर्षापासून रखडवलेली आहे. ऊस कारखान्याला दिला, त्या उसाचे गाळपही झाले. गाळपाची साखरही विकली गेली. मग पैसे गेले कुठे, असा प्रश्न शेतकर्यांसह संपूर्ण फलटण तालुक्याला पडलेला आहे. गेल्या दहा महिन्यांपासून ऊस उत्पादक शेतकरी न्यू फलटण शुगर वर्क्सच्या संचालकांसह फलटणच्या तहसिल व प्रांत कार्यालयाचे उंबरे झिजवत आहेत. तरी हा तिढा अद्याप सुटलेला नाही. संचालकांच्या तारीख पे तारीख या धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकर्यांच्या या प्रकरणात आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही उडी घेतली आहे. शेतकर्यांना जोपर्यंत पेमेंट मिळत नाही तोपर्यंत प्रांत कार्यालयातून हालणार नाही, असा पवित्रा काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण- पाटील व सातारा युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी घेतला होता. मात्र, गेल्या काही दिवसांत न्यू फलटण शुगर वर्क्सच्या तिढ्यात तालुक्यातील एका तथाकथित उद्योजकाने उडी घेवून दहा कोटींची देणी देण्याचे आश्वासन शेतकर्यांना दिले. तसेच न्यू फलटण शुगर वर्क्सचा करार करुन आम्ही कारखाना 151 कोटी रुपयांना चालविण्यास घेत आहोत, अशी ग्वाही दिली होती.
या बिनबादल बरसातमुळे ऊस उत्पादक शेतकरी सुखावला. मात्र न्यू फलटण शुगर वर्क्स चालविण्यास घेणारा व शेतकर्यांची देणी भागविण्याची वल्गना करणारा तथाकथित उद्योजकाचा भूतकाळ हा ‘गंडवागंडवी’चा असल्याची कुणकूण शेतकर्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांना लागल्यानंतर पुन्हा एकदा शेतकर्यांच्या उसबिलाची रक्कम अधांतरीच राहिलेली आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेत तथाकथित उद्योजकाने शेतकर्यांची दहा कोटी रुपयांची ऊसबिल रक्कम प्रांताधिकार्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती दिली होती. तसेच उर्वरित रक्कम 14 सप्टेंबरपर्यंत जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप फलटण प्रांतांच्या खात्यात दहा कोटी जमा झाले की नाही, याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. फलटण प्रांत संतोष जाधव हे डोक्याला ताप नको म्हणून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचे फोनही उचलत नाहीत. त्यामुळे या सर्व प्रकरणामध्ये सस्पेन्स वाढलेला आहे. तथाकथित उद्योजकाच्या म्हणण्यानुसार 10 कोटी रुपये प्रांतांच्या खात्यावर जमा केले आहेत, तर फलटण प्रांताधिकारी गप्प का आहेत, असा सवाल ऊस उत्पादक शेतकरी करीत आहेत. पाठिमागे या सर्व प्रकरणामध्ये खा. शरद पवारांनी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकर्यांनी केली होती. मात्र ऐनवेळी शरद पवारांनी ‘हँडसअप’ केल्यामुळे साळुंखे पाटलांना तोंडघशी पडावे लागले होते. त्यामुळे याहीवेळी तथाकथित उद्योजकामुळे पुन्हा एकदा साळुंखे पाटलांना तोंडघशी पडावे लागू नये, अशी अपेक्षा ऊस उत्पादक शेतकरी करीत आहेत.
‘त्या’ आदेशाचे पुढे काय?
न्यू फलटण शुगर वर्क्स वर कारवाई करण्याचे आदेश यापूर्वी साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी जिल्हाधिकारी सातारा यांना दिले होते. कारखान्याची स्थावर व जंगम मालमत्तेचा लिलाव करुन ऊस उत्पादक शेतकर्यांची बिले त्वरित भागवावीत, असे स्पष्ट आदेश असतानाही फलटण प्रांतांनी चालढकल का केली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शरद पवारांची शिष्टाई फळाला आली नाही
मध्यंतरी न्यू फलटण शुगर वर्क्सचा तिढा वाढल्यानंतर शेतकर्यांनी याबाबत तीव्र आंदोलन केल्यानंतर राजकीय वैर विसरुन न्यू फलटण शुगर वर्क्सचे सर्वेसर्वा प्रल्हाद साळुंखे-पाटील यांनी सभापती मिस्टर रामराजेंना साकडे घालून खासदार शरद पवारांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती. याबाबतचे वृत्तही स्थानिक प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. मात्र अनेक महिने उलटूनही ऊस उत्पादक शेतकर्यांच्या बिलाचा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही. त्यामुळे मिस्टर रामराजेंसह खा. शरद पवारांची शिष्टाई फळाला आली नाही, अशी चर्चा फलटण तालुक्यात आहे.
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |