01:48am | Nov 06, 2019 |
सातारा : दि. 1 रोजी सातार्यातील ज्वेलर्सच्या दुकानातून सोने चोरीप्रकरणी दोन कामगारांना अटक केली असता केवळ दोन तोळेच सोने चोरले असल्याची कबुली त्यांनी दिल्याने प्रकरणात 'ट्विस्ट' वाढला असून पोलिस बुचकळ्यात पडले आहेत. दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 9 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. दरम्यान, पोलिस या घटनेचा तपास करत असून त्यानंतर नेमकी माहिती समोर येणार आहे.
निसार सादीक खान (वय 26) व प्रमोद कुमार उर्फ प्रभूदेवा (दोघे रा.नोरपूर, शाहदाबाग, उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्या व पोलिस कोठडी मिळालेल्या दोघ संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी उमेश रमेश घोडके (वय 45, रा.कोटेश्वर मंदीर शेजारी, सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारदार यांचे शनिवार पेठेत सोन्या-चांदीचे दुकान आहेे. शविनार दि. 1 रोजी तक्रारदार यांनी संशरित दोन्ही कामगारांना सोन्याच्या चैनी जॉईंट करण्यासाठी व त्यांना फासे बसवण्याचे काम सांगितले. यासाठी सुमारे अर्धा किलो वजनाच्या सोन्याच्या चैनी त्यांना दिल्या. दुपारी साडे बारा वाजता मात्र दोन्ही संशयितांनी अर्धा किलो वजनाचा सोन्याचा ऐवज लंपास केला. या घटनेनंतर तक्रारदार यांनी तशी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर 15 लाख रुपयांच्या सोन्याच्या ऐवजामुळे एलसीबीने तपासाला सुरुवात केली. संशयित भोपाळमध्ये असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांना सोमवारी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु होती. दोघा संशयितांना ताब्यात घेवून त्यांना सातार्यात आणले. शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार हसन तडवी यांनी दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 9 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. शाहूपुरी पोलिसांनी संशयितांकडे प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी 15 लाखाचे नव्हे तर 60 हजार रुपये किंमतीचा दोन तोळे वजनाचा सोन्याचा ऐवज चोरला असल्याची कबुली दिली. संशयितांच्या या कबुली जबाबाने पोलिस बुचकळ्यात पडले.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |