सातारा : कोडोली, ता. सातारा येथील सम्राट चौकात दिवसाढवळ्या सम्राट विजय निकम (वय 27) या युवकाचा पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्रे व बेसबॉलच्या लाकडी दांडक्याने मारहाण करत निर्घृण खून केल्याप्रकरणी सुमारे तीन महिन्यानंतर ‘रावण गँग’चा म्होरक्या धिरज शेळके (रा.जकातवाडी ता.सातारा) याला पोलिसांनी अटक केली. या टोळीला मोक्का लागला असून संशयित धिरज शेळके हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे.दरम्यान, तीन महिने तो पोलिसांना गुंगारा देत असल्याने त्याबाबत आश्चर्य व्यक्त होत असून वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी उलट तपास करण्याची गरज निर्माण झालेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कोडोली येथे साई सम्राट धाब्याचे मालक विजय निकम यांचा मुलगा व कोडोलीचे माजी सरपंच संजय निकम यांचा पुतण्या सम्राट निकम हा मंगळवारी दि. 14 जानेवारी 2019 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन निघाला होता. पेट्रोलपंपावरून घरी जात असताना सातारा-रहिमतपूर रस्त्यावरील काळोशी गावाकडे जाणार्या सम्राट चौकालगत संशयित दबा धरून बसले होते. सम्राट हा काळोशीकडे जाणार्या मुख्य चौकात आला असता दबा धरून बसलेल्या 4 ते 5 हल्लेखोरांनी त्याच्यावर बेसबॉल, स्टीक व धारदार कोयत्याने वार केले.
अचानक हा हल्ला झाल्याने सम्राटला प्रतिकार करता आला नाही. या हल्ल्यात सम्राट गंभीर जखमी झाला व तेथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला. हल्लेखोरांनी डोक्यात व तोंडावर वर्मी घाव केल्याने सम्राट रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला. भरदिवसा व वर्दीच्या रस्त्यावरच हा हल्ला झाल्याने परिसरातील नागरिकांचाही अक्षरश: थरकाप उडाला. अवघ्या 15 ते 20 सेकंदामध्ये हल्लेखोरांनी हल्ला केला व दांडकी तेथेच टाकून पळ काढला.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |