03:47am | Sep 24, 2018 |
सातारा : यावर्षीचा सातार्यातील गणेशोत्सव खर्या अर्थाने वादळी ठरला. गणेश विसर्जन कोठे करायचे यापासून डॉल्बी वाजणारच! अशा प्रश्नांमधून गेले दहा दिवस गणेशोत्सवाने मार्गक्रमण केले. आज ना डॉल्बी वाजला, ना राडा झाला. पोलिसांच्या चोख नियोजनामुळे रात्री उशिरापर्यंत गणपती विसर्जन होत असून पहाटेपर्यंत गणेश विसर्जन होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
आज सकाळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, नगराध्यक्षा माधवी कदम, तहसिलदार नीलप्रसाद चव्हाण, पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या हस्ते सातार्यातील मानाच्या गणपतींसह सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. माची पेठ, केसरकर पेठ, शाहू नगर, शाहूपुरी, सदर बझार, गोडोली येथील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुका बुधवार नाक्यावर खोदण्यात आलेल्या कृत्रिम तळ्याकडे कूच करु लागल्या. पोवई नाक्यावर सुरु असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे मुंगीच्या गतीने मिरवणुका मार्गक्रमण करीत होत्या. राजपथ, कमानी हौद, शेटे चौक, 501 पाटी ते समर्थ चौक, राधिका थिएटर मार्गे बुधवार नाका येथील कृत्रिम तळे असा मिरवणुकीचा मार्ग आहे. सकाळपासूनच पारंपारिक वाद्यांच्या निनादात गणेशाला निरोप देण्यासाठी सातारकर रस्त्यावर आले होते.
उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सातारचे खा. उदयनराजे भोसले यांनी डॉल्बी वाजणारच, असा सातारकरांना शब्द दिला होता. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सातार्यात झालेल्या गणेशोत्सवाच्या बैठकीत ‘नो डॉल्बी’ असा आदेश सातारा पोलिसांना दिला होता. त्यानुसार सातारा पोलिसांनी मास्टर प्लॅन आखत जिल्ह्यातील डॉल्बीच गेल्या आठ दिवसात सील केले होते. त्यामुळे आज डॉल्बी वाजलेच नाहीत. त्यामुळे अनेक मंडळांची गोची झाली. पारंपारिक ब्रास बँड व ढोल ताशा पथकांना ऐनवेळी मंडळांना पाचारण करावे लागले. गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवात हद्दपार झालेली पारंपारिक वाद्ये सातारा शहरात वाजल्यामुळे सातार्यातील नागरिक सुखावले. एक सात्विक सोहळा पार पडत असल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहर्यावर दिसून येत होते. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनूचित घटना अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पोलीस उप अधीक्षक गजानन राजमाने, सातारा शहरचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, शाहूपुरीचे किशोर धुमाळ यांनी कालपासूनच तगडे नियोजन केल्यामुळे आज गणेश विसर्जन सुरळीत पार पडत आहे. पहाटेपर्यंत विसर्जन सुरु राहणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मात्र संध्याकाळी कृत्रिम तळ्यातील स्टेज खचल्यामुळे गणेश विसर्जन काही काळासाठी बंद करण्यात आले होते. पालिकेच्या या ढिसाळ नियोजनाचा काही मंडळांनी तीव्र भाषेत निषेध व्यक्त केला.
स्वाईन फ्ल्यूने जिल्ह्यात पाय पसरले आहेत. खबरदारी म्हणून अनेक पोलीस व अधिकार्यांनी स्वाईनचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी तोंडाला मास्क लावले होते. गर्दीच्या ठिकाणी स्वाईन फ्ल्यूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून जिल्हा पोलीस दलाच्यावतीने अधिकारी व कर्मचार्यांना या मास्कचे वाटप करण्यात आले होते.
दोन परप्रांतीय युवकांचा बुडाल्याने मृत्यू
आज सकाळी संगम माहुली येथे कृष्णा-वेण्णा संगमावर घरगुती गणेशांचे विसर्जन सुरु असताना संगम माहुली परिसरात राहणारे सहा परप्रांतीय युवक आंघोळीसाठी संगमावर आले होते. आंघोळ करीत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने खोल डोहात ते ओढले गेले. पोहता येत नसल्याने हे सहाहीजण बुडू लागल्याने गणपती विसर्जनासाठी आलेल्या काही लोकांना हे युवक बुडू लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर तत्काळ युवकांनी पाण्यात उडी मारत सहापैकी चारजणांना बाहेर काढले. मात्र, दोघेजण खोल पाण्यात बुडाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संगम माहुलीत सकाळी गणेश विसर्जनास गालबोल लागले.
आमदार असूनही शिवेंद्रराजेंना ‘आमदार झाल्या सारखं वाटतंय’
डॉल्बी वाजणार की नाही, या द्विधा मनस्थितीत सातार्यातील सार्वजनिक मंडळे काही दिवस होती. परंतू पोलीस प्रशासनाने डॉल्बी वाजण्या अगोदरच त्या डॉल्बी सिस्टम जप्त केल्यामुळे डॉल्बी नावालाही शिल्लक राहिल्या नाहीत. त्यामुळे आज पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका शांततेत निघाल्या. सातार्यातील राजपथावर नगर विकास आघाडीकडून गणेश मंडळांच्या स्वागतासाठी भव्य मंडप घालण्यात आला होता. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले हे कार्यकर्त्यांसमवेत स्वत: हजर होते. मिरवणुका स्वागत मंडपाजवळ आल्यानंतर ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ या गाण्यावर आ. शिवेंद्रराजेंनी ताल धरला. शिवेंद्रराजे डान्स करताहेत म्हटल्यावर कार्यकर्तेही डान्स करु लागले. आमदार असूनही शिवेंद्रराजेंना ‘आमदार झाल्यासारखं का वाटतंय?’ असा प्रश्न अनेक गणेश भक्तांना पडला.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |