09:32pm | Apr 25, 2020 |
सातारा : राज्यात कोविड-19 या विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूंच्या संसर्गात अधिक वाढ होऊ नये या करिता ग्रामीण भागामध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने ग्रामपातळीवर राबविण्याची व पार पाडावयाची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे.
ग्रामणी भागामध्ये काम करणारे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, आशासेविका, अंगणवाडी अथवा वैद्यकिय क्षेत्राशी निगडित काम करणारे सर्व कर्मचारी यांची त्यांच्या राहत्या घराच्या ठिकाणापासून कर्तव्याच्या ठिकाणी जाणे-येणे होत आहे. अशा सेवक-सेविकांना गावामध्ये प्रवेश नाकारत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. अशा सर्व कर्मचाऱ्यांना गाव पातळीवर गठीत गाव समिती, ग्रामस्थ यांनी कोणत्याही प्राकारचा अडथळा करु नये, उलट कोरोना विषाणूच्या अनुषंगाने वैद्यकिय क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या अत्यावश्यक बाबींकरीता पुरेसा वेळ देता येत नसल्याने, त्यांच्या दैनंदिन गरजा, अत्यावश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी गावपातळीवरुन संबंधित कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारचे सहकार्य, मदत होणे गरजेचे आहे.
अशा कर्मचाऱ्यांना कोणकडूनही कोणतही प्रकारची अडवणूक, दमदाटी केली जाणार नाही अथवा संबंधित कर्मचाऱ्यांची गैरसोय होणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी गठीत करण्यात आलेल्या ग्रामपतळीवरील कृती समिती यांचेवर राहील. अडवणूक करणाऱ्या ग्रामस्थांवर गठीत ग्रामसमितीने कठोर कारवाई करावी. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित ग्रामपातळीवर गठीत करण्यात आलेल्या समितीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी एका परिपत्रकानुसार कळविले आहे.
वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचारी वर्गानेही कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेऊ नये. संबंधितांना आपआपल्या कार्यक्षेत्रात मास्क, हॅन्डग्लोज, सॅनिटायझर इ. चा वापर करणे व सोशल डिस्टन्सींगचा वापर करावा.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |