03:03am | Jun 08, 2018 |
सातारा : ग्राहक चळवळीशी निगडीत व सामाजिक बांधिलकीचा दृष्टीकोन ठेवून कार्य करणार्या सातारा येथील जिल्हा पुरवठा अधिकारी सौ. वसुंधरा बारवे यांना यावर्षीचा स्व. बिंदू माधव जोशी ग्राहक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सातारा ग्राहक न्याय मंचाचे अध्यक्ष श्री. पवार यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे विभागीय अध्यक्ष केदार नाईक, रंगराव जाधव, ऍड. श्रीराम देव, राजेंद्र कासट, रितेश रावखंडे, विनायक भिसे, डॉ. सौ. संगीता चव्हाण, सौ. बिडवे, श्रीयुत पाटील, सौ. मनिषा गायकवाड उपस्थित होते.
जिल्हा पूरवठा अधिकारी असून शासनाच्या ग्राहक संरक्षण परिषदेच्या सचिव म्हणून कार्यरत असताना सौ. बारवे यांनी आपल्या कार्यकाळात ग्राहक संरक्षण परिषदेला वेगळे स्थान निर्माण करून दिले. ग्राहकांचे प्रश्न नियमित व त्वरीत मार्गी लागावेत यासाठी तीन महिन्यातून होणारी बैठक दर महिना घेण्यास सुरवात केली. या परिषदेच्या बैठकीला गेली अनेक वर्षे जिल्हाधिकारी उपस्थित राहत नसत परंतु सौ. बारवे यांचे कार्यकाळात जिल्हाधिकारी उपस्थित राहून अनेक ग्राहकांच्या समस्यांवर त्वरीत निर्णय घेण्यात आले. एक सक्षम ग्राहकाभिमुख काम करणार्या सौ. बारवे यांना याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी जोगेंद्र कटयारे यांना उपजिल्हाधिकारी म्हणून बढती मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार ग्राहक पंचायतीचे वतीने करण्यात आला.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |