सातारा : पीपल्स रिपब्लिकन पार्टी आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रतील सोळा जागा स्वबळावर लढणार असल्याचा निर्णय पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नुकत्याच झालेल्या उच्चधिकार समितीचा बैठकीत औरंगाबाद येथे घेण्यात आला, अशी माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी सातारा येथील पत्रकार परिषदेत दिली आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातुन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी निवडणूक लढावी, अशी मागणी पी.आर.पी च्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांनी केली असून प्रा.जोगेंद्र कवाडे हे स्वत: या मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे जयदीप कवाडे यांनी स्पष्ट केले आहे.
लोकसभेच्या सोळा मतदारसंघात भंडारा-गोंदिया, नागपूर, रामटेक, बुलढाणा, लातूर, पुणे, वाशीम-यवतमाळ, चंद्रपूर, हातकणंगले, औरंगाबाद, उत्तर-मध्ये मुंबई, वर्धा, अकोला, सोलापूर, नांदेड, हिंगोली या सर्व जागी स्वबळावर निवडणूक लढण्यास पी.आर.पी ने कंबर कसली आहे.
सवयीप्रमाणे राष्ट्रीय काँग्रेसने विश्वासघात केला आहे. मागील लोकसभेच्या निवडणुकीपासून पीपल्स रिपब्लिकन पक्ष हा काँग्रेसचा मित्रपक्ष होता, तरीही चार वर्षात कोणताही प्रतिसाद न देता काँग्रेसने परस्पर आपल्या लोकसभेच्या जागा घोषित केल्यामुळे आता काँग्रेस सोबत यानंतर कोणत्याही प्रकारची बोलणी करायची नाहीत, असा निर्णय पक्षाच्या उच्चधिकार समितीने घेतला आहे, अशीही माहीती राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेला सातारा जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे, कार्याध्यक्ष संजय गाडे, संतोष सपकाळ व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. कोरेगाव येथे पक्षाच्या भव्य मेळाव्यानिमित्त कवाडे साताऱ्यात आले होते.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |