सातारा : सातारा शहरातील एका बँकेतून अज्ञाताने बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून खात्यामध्ये पैसे भरुन देतो, असे सांगून ४९ हजार रुपयांची चोरी केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बँकेमध्ये तिर्हाईत व्यक्ती घुसून थेट पैशांवर डल्ला मारु लागल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, महेंद्र निकम (रा. सातारा) हे सोमवारी सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरातील एका बँकेत पैसे भरण्यासाठी गेले होते. पैसे भरण्यासाठी स्लिप पाहत असतानाच एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ गेली. निकम यांच्याकडे चौकशी करत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी निकम अज्ञाताला काय हवे आहे? असे विचारताच अज्ञाताने थेट बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून तुम्हाला मदत करतोय असे सांगितले, अशाप्रकारे विश्वास संपादन करुन पैसे भरण्यासाठी स्लिप भरुन दिल्यानंतर अज्ञाताने फसवणूक करुन जबरदस्तीने निकम यांचे ४९ हजार रुपये चोरुन नेले.
अज्ञाताने पैसे बँकेत न भरता तो घेवून पळत जात असताना महेंद्र निकम यांनी आरडाओरडा केला. मात्र संशयिताने तेथून पळ काढला. अचानक घडलेल्या या घटनेने बँकेसह परिसरात खळबळ उडाली. तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहिती घेवून तक्रारदार यांना शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |