सातारा : कोर्टात सुरु असलेली केस मागे घे, असे म्हणत दुचाकीवरुन पाठलाग करत युवकाला कुबेर गणेश मंदिर परिसरात टोळक्याने बेदम मारहाण केली. यावेळी सहा संशयितांनी युवकाकडून रोख रक्कम व सोन्याचा ऐवज लुटला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यामुळे पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
प्रतीक विनायक नलवडे, निरंजन विनायक नलवडे, किरण हणमंत पवार (तिघे रा.बोगदा परिसर), सचिन हणमंत पवार (रा.समर्थ मंदीर परिसर व त्याचे अनोळखी तीन साथीदार) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी निखिल कुमार कुराडे (वय 23, रा.मंगळवार पेठ, सातारा) या युवकाने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तक्रारदार युवक दुचाकीवरुन सदरबझारकडे निघाला होता. यावेळी संशयितांनी तक्रारदार युवकाचा पाठलग केला व त्याला गाडी आडवी मारुन कुबेर गणेश मंदिर परिसरात थांबवले. यावेळी संशयितांनी ‘तू चालू असलेली कोर्टातील केस मागे घे,’ असे म्हणत राडा केला. तक्रारदार युवकाच्या तोंडावर, पाठीवर लाथा, बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी संशयितांनी तक्रारदार युवकाच्या खिशातील रोख 15 हजार रुपये व गळ्यातील 60 हजार रुपये किंमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची चेन असा 75 हजार रुपयांचा ऐवज जबरस्तीने घेतला. यावेळी संशयितांनी दमदाटी, शिवीगाळ केली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होेते.
या घडलेल्या घटनेनंतर तक्रारदार युवकाने शहर पोलिस ठाण्यात जावून घटनेची माहिती दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांमध्ये सुमारे सात जणांचा समावेश असल्याने तसेच रोख रक्कम व सोन्याचा ऐवज गेल्याने दरोड्याचा गुन्हा दाखल केला.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |