मुंबई : 'बिग बॉस मराठी'च्या घरातून अभिजीत बिचुकलेला अटक झाल्यानंतर तो पुन्हा घरात येणार की नाही याबाबत अनेक तर्क लावले जात असतानाच बिग बॉसच्या घरात बिचुकलेची रीएंट्री होणार हे निश्चित झाले आहे. बिचुकले आजच कोल्हापुरातून मुंबईत दाखल होत असून तो उद्या (रविवारी) प्रक्षेपित होणाऱ्या भागात दिसेल, असे सांगण्यात आले.
बिग बॉस मराठी सीजन-२ च्या पहिल्या भागापासूनच अभिजीत बिचुकले या ना त्या कारणाने चर्चेत होता. नंतर २१ जून रोजी चेक बाउंस प्रकरणी त्याला बिग बॉसच्या घरातून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात जामीन मंजूर झाल्यानंतर बिचकुले बिग बॉसच्या घरात परत येणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, खंडणीच्या जुन्या प्रकरणात त्याला अटक झाली व न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
आता खडंणी प्रकरणात बिचकुलेला शुक्रवारी जामीन मिळाला असून तो बिग बॉसमध्ये परतणार हे निश्चित झाले आहे. त्याची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून सुटका झाली असून तो आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास कोल्हापूरहून मुंबईकडे निघाला आहे. तो आजच मुंबईत परतणार असून उद्या प्रक्षेपित होणाऱ्या भागात तो प्रेक्षकांना दिसेल, असे सांगण्यात आले.
दरम्यान, बिचुकले पुन्हा घरात आला नाही, तर शोच्या टीआरपीला फटका बसू शकतो, हे लक्षात घेऊन त्याला बिग बॉसमध्ये परत घेण्याचे निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |

भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |