05:38pm | Feb 05, 2019 |
सातारा : स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष व युवानेते दिगंबर रोहिदास आगवणे यांना 29 जानेवारी रोजी व्मोबाईलवर मॅसेज करुन अर्वाच्च शिवीगाळ करीत एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करुन जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी दिगंबर आगवणे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष व युवानेते दिगंबर रोहिदास आगवणे (वय 37) रा. गिरवी, ता. फलटण यांना 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या मोबाईलवर 7841954800 वरुन टेक्स्ट मॅसेज आला. यावेळी मी सोमनाथ भगवान जाधव आहे. माझ्या अकौंटवर पाच दिवसांत एक लाख जमा कर, नाहीतर मरशील. धनकुडे साहेबांची ऑर्डर आहे. सदर व्यक्तीने आगवणे यांना बँकेचा अकौंट नंबर व आयएफएससी कोडही पाठवला आहे. त्यानंतर आगवणे यांनी आपण कोणा सोमनाथ जाधव याला पैसे देणे लागत नाही, त्यामुळे असा मॅसेज कसा आला? याबाबत पडताळणी करीत असतानाच दि. 30 जानेवारी रोजी सकाळी 11.45 वाजता पुन्हा त्याच नंबरवरुन अर्वाच्च भाषेत शिवीगाळीचा मॅसेज पाठवून पैसे का पाठविले नाहीत? अशी धमकी देण्यात आली. यानंतर दिगंबर आगवणे यांना कोणीतरी आपल्याला खंडणीसाठी धमकावत असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी आज दि. 5 फेब्रुवारी रोजी दुपारी याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दिगंबर आगवणे यांना शिवीगाळ व खंडणीसाठी धमकावल्यामुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक तपास फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे करीत आहेत.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |