सातारा (संग्राम निकाळजे) : राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार काल सातार्यात येवून गेले काय, आणि लगेचच सातारच्या राजघराण्याच्या भाऊबंदकीत साखरपेरणी झाली. गेल्या काही महिन्यांपूर्वी एकमेकांची नजरानजर टाळण्यासाठी आटापिटा करणारे खासदार श्री. छ. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रराजे गिलेशिकवे विसरुन ‘तुझ्या गळा, माझ्या गळा गुंफू लोकसभा-विधानसभेच्या माळा’ असा सूर कालपासून आळवला जात आहे. आज यवतेश्वर घाटात चक्क हातात हात घालून दोघांनी ‘व्ही फॉर व्हिक्टरी’ची खूण दाखवत ‘तेरी मेरी यारी’ असल्याचे सिद्ध केले.
गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत सातार्याच्या राजघराण्याचे ऐतिहासिक मनोमिलन तुटले. या मनोमिलनाच्या तड्याला फलटणकरांची बत्ती होती. काही गोष्टी एकत्र बसूनही संपवता येतात. मात्र, नगरपालिकेच्या निवडणुकीत आ. शिवेंद्रराजेंच्या पत्नी सौ. वेदांतिकाराजे यांचा थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यामुळे हा पराभव आ. शिवेंद्रराजेंच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे आमदार-खासदारांमध्ये टोकाचे वितुष्ट निर्माण झाले होते. सोना एलॉयज खंडणी प्रकरणामुळे उदयनराजे बॅकफूटवर आले होते. त्याचदरम्यान फलटण व बारामतीकरांनी आनेवाडी, ता. जावली येथील टोलनाक्याच्या अनुषंगाने सुरुंगाच्या वातीला बत्ती दिली आणि त्यामुळे सातार्यात विस्फोट झाला. त्यानंतर घडलेले सुरुची राडा प्रकरण सातारकर अद्याप विसरलेले नाहीत.
आगामी लोकसभा- विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येवून ठेपलेल्या आहेत. सत्तेत नसल्यामुळे राष्ट्रवादीसह कॉंग्रेसचीही जिल्ह्यात वाताहत झाली आहे. आगामी निवडणुकांमध्ये कधी काय होईल, याची शक्यता आताच वर्तविणे शहाणपणाचे नाही. असे असताना रुसवे-फुगवे, तंटे-बिखेडे विसरुन हातात हात घालून आगामी निवडणुका लढवल्या तरच भाजपचा वारु थोपवता येणार आहे, हे राष्ट्रवादी सुप्रिमो खा. शरद पवार यांना माहित आहे. गेल्या काही महिन्यांपासून खासदार पवारांचे सातारा विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सातारा दौरे वाढले आहेत. यानिमित्ताने ते जिल्ह्यातील लोकसभेचा व विधानसभेची 'क्रॉसटॅली' करीत असतात. सध्या कराड उत्तर, कोरेगाव, वाई हे विधानसभा मतदारसंघ डेंजरझोनमध्ये आहेत. त्यात उदयनराजेंची ‘मै खडा, तो सरकार से बडा’ ही मोंडस ऑपरेंडी चालली तर हे तिनही विधानसभा मतदारसंघासह हक्काची लोकसभा सीटही हातातून जावू शकतात. त्यामुळे पवारांनी ‘एकला चलो रे’ म्हणणार्या उदयनराजेंचा हात पुन्हा हातात घेत थोडं सबुरीनं घ्या, डोकं शांत ठेवा, असा सल्ला काल झालेल्या कार्यक्रमात दिला.
दरम्यान, कालपासून विविध कार्यक्रमात हातात हात घालून फिरणार्या सातारच्या आमदार- खासदारांनी आज यवतेश्वर घाटातील प्रकृती रिसॉर्ट येथे सातारा रनर्स फौंडेशनच्या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ‘व्ही फॉर व्हिक्टरी’ची खूण दाखवत ‘अब हम दो नहीं, एकही हैं’ अशी खूण दाखवत किमान येणार्या निवडणुकीत तरी तेरी मेरी यारी, ‘व्ही फॉर व्हिक्टरी’ असे म्हणत ‘तुझ्या गळा, माझ्या गळा गुंफू लोकसभा-विधानसभेच्या माळा’ असा सूर आळवला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |