कराड : गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेती, घरे, शेतीचे विद्युत पंप आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे नि:पक्षपातीपणे करावेत, अशी मागणी सातारा जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असल्यामुळे हजारो हेक्टर जमीन, खरीप पिके पाण्याखाली गेली होती. यामध्ये भुईमूग, सोयाबीन, भात, कडधान्य, भाजीपाला तसेच ऊस आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी ओढ्याचे, नदीचे पाणी नदीलगत, ओढ्यालगत असणार्या विहिरीमध्ये गेल्याने विहिरीची पडझड तसेच विहिरीत मोठ्या प्रमाणात गाळ व घाण साठवून नुकसान झाले आहे. तसेच नदीकाठी शेती, पंप, पाईपलाईन वाहून गेले आहेत. मीटरमध्ये पाणी गेल्याने स्टार्टर, ऑटो, मीटर आदींचीही प्रचंड नुकसान झाल्याने सदरचे मीटर विद्युत वितरण कंपनीकडून नवीन बसण्याचीही मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
या सर्व बाबींचा विचार होऊन महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या नुकसानीचे पंचनामे नि:पक्षपातीपणे करण्याचे निवेदन सातारा जिल्हा स्वाभिमानी संघटनेने केले आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा उपाध्यक्ष देवानंद पाटील, कराड दक्षिण तालुकाध्यक्ष बापू साळुंखे, संघटक रामचंद्र साळुंखे, कराड उत्तर तालुकाध्यक्ष प्रमोद जगदाळे, सातारा जिल्हा प्रवक्ते विकास पाटील, कराड तालुकाध्यक्ष युवा प्रदीप मोहिते यांच्या हस्ते तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देण्यात आले.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |