सातारा : सातार्यातील सर्वात मोठे उपनगर असलेल्या करंजे ते म्हसवे या दोन महत्त्वाच्या गावांना जोडणार्या रस्त्यावर खड्ड्यात रस्ता की रस्त्यावर खड्डा? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करणार्या वाहनचालकांना नसता मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी करंजे व म्हसवे ग्रामस्थांनी केली आहे.
सातारा शहरातून करंजेतून म्हसवेकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. तसेच या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती आहे. पिलेश्वरीनगर, भैरवनाथ कॉलनीमध्ये हजारो लोक बंगले तसेच अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत. या रस्त्यावर माजी सैनिकांच्या मुली व मुलांचे वसतीगृह आहे. असे असतानाही गेल्या दोन वर्षापासून या रस्त्यावर मोठ-मोठाले खड्डे पडले आहेत. दोन वर्षापूर्वी घोरपडे नावाच्या ठेकेदाराने या रस्त्याचे काम पूर्ण केले होते. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे काही महिन्यांतच या रस्त्यावर खड्डे निर्माण झाले. यावर्षी सातारा शहरात सलग 60 दिवस पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरासह उपनगरातील रस्त्यांची दैना झाली आहे. सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न गेली अनेक वर्षे रखडलेला आहे. शाहूपुरी ग्रामपंचायत अंतर्गत करंजे-म्हसवे रस्ता येतो. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे हा रस्ता महत्त्वाचा असूनसुद्धा त्याच्या डागडुजीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येणार्या काही दिवसांत या रस्त्याची तातडीने डागडुजी न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कुंभार यांनी दिला आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |