02:09am | Mar 06, 2020 |
कराड : शिक्षण घेऊन पदवी मिळवणे महत्वाचे नसून कौशल्यावर आधारित शिक्षण संपादन करणे आवश्यक आहे. शिक्षणातून माणुसकीचे दर्शन घडून गावाचा विकास साधता आला पाहिजे, असे प्रतिपादन त्रिशक्ती फ़ौडेशन, पुणे व विजय दिवस समारोह समिती, कराडचे अध्यक्ष कर्नल संभाजीराव पाटील यांनी कराड येथील शिक्षणमहर्षी बापुजी साळुंखे महाविद्यालयातील एका कार्यक्रमात केले.
शिक्षणमहर्षी बापुजी साळुंखे महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाचा महाविद्यालयीन स्तरावरील ‘पदवी’ प्रमाणपत्र वितरण 2020 हा बुधवारी दि. 4 मार्च रोजी संपन्न झाला. त्यावेळी कर्नल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी विशेष उपस्थिती शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे अधिसभा सदस्य डॉ. राजेंद्र थोरात यांची होती तर अध्यक्षस्थान श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरचे सहसचिव (अर्थ) प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ यांनी भूषवले.
या समारंभाचे औचित्य साधून शिक्षणशास्त्र महाविद्यालय, कराडचाही ‘पदवी’ प्रमाणपत्र वितरण समारंभ उपरोक्त समारंभावेळी संयुक्तपणे उत्साहात संपन्न झाला. पुढे बोलताना कर्नल संभाजीराव पाटील म्हणाले, समाजातील अंधश्रद्धा, गरिबी व आळस झटकून टाकण्यासाठी महात्मा फुले, बापुजी साळुंखे, गाडगे महाराज यांनी शिक्षणाची दारे खेडोपाडी, डोंगराळ, दुर्गम अशा ग्रामीण भागात खुली केली. विद्यार्थ्यांनी शिस्त, शिष्टाचार व वागण्याची पद्धती सुधारली पाहिजे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थ सहसचिव डॉ.राजेंद्र शेजवळ म्हणाले, शिक्षणातून विद्यार्थी घडावा आणि त्याच्यात चैतन्य निर्माण व्हावे. स्वतःमधील परमेश्वर ओळखून स्वतःचा विकास साधता आला पाहिजे. जगणे सुंदर करण्यासाठी संस्कार महत्वाचे आहेत.त्यासाठीच बापुजी साळुंखे यांनी सुसंस्काराला महत्व दिले.
कार्यक्रमाची प्रस्तावना व स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष शेळके यांनी केले. पाहुण्यांचा परिचय उप प्राचार्य अधिकराव कणसे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. शोभा लोहार व प्रा. टी. एम. आतार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा. सुरेश काकडे यांनी मानले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. दयानंद कराळे, प्रा. दिलीपकुमार मोहिते, गुरुदेव कार्यकर्ते, स्नातक, विद्यार्थी- विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |