कराड : कराड तालुक्यातील मुंढे गावचा सुपूत्र संदीप रघुनाथ सावंत (वय 30) जम्मू-काश्मिरच्या नौसेरा सेक्टरमध्ये अतिरेकी हल्ल्यात मंगळवारी सायंकाळी शहीद झाला. सप्टेंबर 2011 मध्ये तो बेळगाव येथे सैन्य दलात भरती झाला होता. त्यांच्या शहीद होण्याची बातमी समजताच मुंढे गावावर शोककळा पसरली आहे.
संदीप हा 16 मराठा बटालियनमध्ये कार्यरत होता. जम्मू-काश्मिरमधील नौसेरा सेक्टरमध्ये मंगळवारी सायंकाळी अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत गोळी लागून तो शहीद झाला. ही बातमी मुंढे ग्रामस्थांना बुधवारी सकाळी 10 वाजता समजली. गावचा सुपूत्र शहीद झाल्याने मुंढे गावावर शोककळा पसरली आहे. संदीपचा थोरला भाऊ शशिकांत याच्याशिवाय कुटुंबातील इतरांना याबाबत माहिती कळू दिलेली नाही.
संदीप याचा जन्म मुंढे येथे दि. 11 ऑक्टोबर 1990 रोजी झाला होता. त्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विजयनगर (ता. कराड) येथील प्रेमलाकाकी चव्हाण विद्यालयात आणि महाविद्यालयीन शिक्षण कराडच्या शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात झाले होते. तीन वर्षापूर्वी त्याचा विवाह झाला होता. त्यास तीन महिन्याची मुलगी आहे. मुलीच्या बारशासाठी पाच दिवसांची सुट्टी घेऊन पंधरा दिवसापूर्वी तो गावी आला होता. त्यानंतर तो कर्तव्यावर गेल्यावर त्याच्या शहीद होण्याची बातमी आली. त्यामुळे मुंढे ग्रामस्थ आणि संदीपच्या मित्रांना धक्का बसला आहे. संदीप मनमिळाऊ स्वभावाचा होता, अशी आठवण त्याच्या मित्रांनी सांगितली.
संदीपचे पार्थिव गावी कधी येईल, याबाबतही अधिकृत माहिती अद्याप प्रशासनालाही देण्यात आलेली नाही. सातारा जिल्हा सैनिक कल्याण बोर्डालाही फक्त संदीप सावंत हा जवान शहीद झाल्याचे कळविण्यात आले आहे. इतर कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंढे ग्रामस्थ संदीपच्या पार्थिवाच्या प्रतिक्षेत आहेत. संदीपच्या निधनामुळे गावावर शोककळा असली तरी गावचा सुपूत्र अतिरेक्यांशी लढताना शहीद झाला, याचा अभिमान देखील ग्रामस्थ आणि युवकांना आहे.
संदीप सावंत 28 सप्टेंबर 2011 रोजी सैन्यात भरती झाले होते. 12 वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करुन 18 मराठा बटालियनमध्ये समाविष्ट असलेल्या संदीप सावंत यांनी भरतीनंतर राजस्थान आणि जम्मू काश्मीर येथे सेवा बजावली होती. संदीप सावंत शहीद झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यामागे त्यांची पत्नी, एक मुलगी, आई-वडील, काका, चुलत भाऊ, बहीण असे कुटुंब आहे. गुरुवारी शहीद संदीप सावंत यांचे पार्थिव पुण्यात आणले जाईल. तिथून त्यांच्या मूळ गावी नेण्यात येईल अशीही माहिती समोर आली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |