02:11am | Dec 22, 2018 |
कराड : सातारा जिल्हयातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी सन 2018 व 2019 चा गाळप हंगाम सुरू होऊन एक ते दीड महिना झाला तरीही अद्याप शेतकर्यांना एफआरपीप्रमाणे बिले अदा केली नाहीत. त्यामुळे अशा कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी केली आहे. याबाबतचे पत्र साखर आयुक्त पुणे यांना दिले आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
पत्रात म्हटले आहे, की ऊस नियंत्रण आदेश 1966 मधील तरतुदीनुसार गळीत केलेल्या उसाचे देयक 14 दिवसांत देणे बंधनकारक आहे. अन्यथा त्या रकमेचे व्याज 15 टक्केप्रमाणे शेतकर्यांना द्यावे असा कायदा असतानाही शेतकर्यांना उसाचे बिल अदा केलेले नाहीत.
ऊसाची बिले वेळेत न मिळाल्याने शेतकर्यांना नाहक सोसायटी व बँकेच्या पीक कर्जाच्या व्याजाचा बोजा सहन करावा लागत आहे. शेतकर्यांना मुलांच्या शिक्षणासाठी, घरातील लोकांच्या वैद्यकीय खर्चासाठी, शेतीच्या मशागतीच्या कामासाठी आज पैशाची चणचण भासत आहे. त्यामुळे शेतकर्यांना त्वरीत ऊस बिले मिळणे गरजेचे आहे.
दरम्यान, शेतकर्यांना आपला ऊस कारखान्याला गाळपास देऊन 14 दिवस होऊन गेले असतील आणि बिले मिळाली नसतील तर स्वतःपुढे येऊन संबंधित कारखान्यावर गुन्हे नोेंद करावेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा शेतकर्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असे नलवडे यांनी सांगितले.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |