12:53am | Jun 09, 2019 |
बिजवडी : नातेपुतेवरून दहिवडीकडे मोटारसायकलवरून येत असताना सुनिल चव्हाण या दाम्पत्यांना दि.१७ मार्च रोजी नातेपुते घाटाच्या शेवटच्या वळणात अनोळखी दोन इसमांनी गाडी अडवून लूटमार केली होती. त्याची नोंद शिंगणापूर पोलीस ठाण्यात झाल्यानंतर पोलीस नाईक अमोल चांगण यांनी खास खबऱ्याच्या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण पाटील ,प्रमोद दिक्षीत यांच्या मार्गर्शनाखाली पोलीस शिपाई सागर अभंग, पोलिस हवालदार नाना भिसे यांच्या सहकार्याने लुटमार करणारे सचिन बलभीम कारंडे ,शहाजी बबन लोखंडे या दोघांना नातेपुते येथे ताब्यात घेतले आहे.
याबाबतची मिळालेली माहिती अशी ,दि.१७ मार्च २०१९ रोजी रात्री ९.१५ वाजता सुनिल अनंत चव्हाण रा.दहिवडी ता.माण हे आपल्या पत्नीसह मोटारसायकलवर नातेपुतेवरून दहिवडीकडे येत असताना नातेपुते घाटात शेवटच्या वळणात एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरील दोघांनी गाडी थांबवण्यास सांगून चव्हाण यांच्या पत्नीच्या हातातील पर्स व मंगळसूत्रही हिसकावून घेत दुचाकीवरून शिंगणापूरच्या बाजूने पळून गेले.या लूटमारीत रोख ५ हजार ७०० रूपये व २५ हजार रूपये किंमतीचे दागिने हिसकावून नेले होते. त्यानंतर सदर घटनेची नोंद शिंगणापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
शिंगणापूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक अमोल चांगण यांनी आपल्या खबऱ्याकडून माहिती सहकाऱ्यांच्या मदतीने लूटमार करणाऱ्या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले आहेत.त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता पोलीस कोठडी देण्यात आली आहे.लूटमारी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेणाऱ्या शिंगणापूर पोलीसांचे विशेषत: पोलीस नाईक अमोल चांगण व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |