फलटण : सुरवडी, ता. फलटण येथे मिठाईचे दुकान चालविणार्या एका व्यावसायिकाचे डेक्कन चौक फलटण येथे दुचाकीच्या डिकीतून सुमारे दहा लाख 7 हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने दिवसाढवळ्या लांबवल्यामुळे फलटण शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, दि. 4 रोजी गोपाल रामदिन वर्मा (वय 20) रा. मूळ अंम्बाह ओरसा, मध्य प्रदेश सध्या रा. सुरवडी, ता. फलटण यांचे सुरवडी येथे मिठाईचे दुकान आहे. मूळगावी घराच्या कामासाठी आई-वडिलांना सुमारे दहा लाख 7 हजार रुपये पाठविण्यासाठी फलटण येथील आयडीबीआय बॅकेमध्ये गोपाल वर्मा त्यांची दुचाकी वरुन गेले असता दुपारच्या जेवणाची सुट्टी झाल्यामुळे बँक कर्मचार्यांनी त्यांना काही वेळानंतर येण्यास सांगितले त्यामुळे ते डेक्कन चौक फलटण येथील वडापावच्या दुकानात वडापाव खाण्यासाठी गेले. वडापाव खावून झाल्यानंतर ते त्यांच्या दुचाकी क्र. एम एच 11- एयु- 267 च्या जवळ आल्यानंतर त्यांनी दुचाकीच्या डिकीत ठेवलेली दहा लाख 7 हजार रुपयांची रोकड तपासली असता त्यांना तेथे रोकड आढळून आली नाही. यानंतर त्यांनी वडापावच्या दुकानचालकाला माझी पैशाची पिशवी तुमच्याकडे राहिली आहे काय? अशी विचारणा केली. मात्र वडापाव दुकान चालकाने आपली कोणतीही पिशवी आमच्याकडे राहिलेली नाही, असे सांगितल्यामुळे आपल्या पैशावर कोणीतरी अज्ञाताने डल्ला मारला आहे, याची खात्री झाल्यानंतर दि. 5 रोजी यासंदर्भात गोपाल वर्मा यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे. फलटण शहरातून एवढी मोठी रक्कम चोरीस गेल्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. काही दिवसांपासून शांत असलेले फलटण शहर या घटनेमुळे हादरुन गेले आहे. याबाबतचा अधिक तपास फलटण शहर पोलीस ठाण्याचे शहर पोलीस निरीक्षक प्रताप पोमण करीत आहेत.
घटना 4 ची, तक्रार 5 ला...
मिठाई व्यावसायिक गोपाल वर्मा हे बँकेत दहा लाख 7 हजार रुपये भरण्यास गेले असता वडापाव खाण्याचा मोह त्यांना आवरला नाही, तसेच एवढी मोठी रक्कम निष्काळजीपणे दुचाकीच्या डिकीत ठेवून वडापाव खाल्ला. परंतू दहा रुपयांच्या वडापावापोटी त्यांना दहा लाख रुपये गमवावे लागले. वास्तविक ही घटना 4 रोजी घडली. परंतू याची तक्रार सुमारे एक दिवसानंतर म्हणजेच 5 नोव्हेंबरला करण्यात आल्यामुळे संशयाला वाव मिळत आहे. नक्की पोलीस, तक्रारदार, की चोर चुकले? याबाबतची जोरदार चर्चा फलटण शहरात आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |