सातारा : कोरोनाच्या धास्तीमुळे लोकांना शारीरिक त्रास होत आहे तसेच मानसिक तणावालाही तोंड द्यावे लागत आहे. अशा लोकांना भावनिक प्रथमोपचार मिळावे यासाठी परिवर्तन संस्था, महाराष्ट्र अंनिस आणि काही समविचारी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येवून मनोबल हेल्प लाईन नावाचा उपक्रम सुरु केला आहे. वीसपेक्षा अधिक तज्ञ समुपदेशक आणि प्रशिक्षित मानस मित्र आणि मैत्रिणी यांच्या माध्यमातून मनोबल हेल्पलाईन चालवली जाणार आहे, अशी माहिती अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी दिली.
कोरोनामुळे सगळा समाज धास्तावलेला आहे. जगभरातून येणाऱ्या बातम्या आपल्यावर आदळत आहेत आणि त्याचबरोबर आपल्याकडेही विषाणूचा संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. याचे आपल्यावर शारीरिक परिणाम तर होत आहेतच, पण मानसिक तणावातूनही आपण जात आहोत. समाजातील काहीजण कुटुंबापासून लांब आहेत. अशा वेळी कोणाशी प्रत्यक्ष भेटता न येणे हेसुद्धा ताणाचे कारण असू शकते. कोरोनाबद्दल खूप उलटी सुलटी माहिती समाज माध्यमांमधून पसरत असल्याने आपल्याला नेमका कशाने संसर्ग होऊ शकतो आणि काय केल्याने त्यापासून सुरक्षित राहू असे विचारही त्रास देवू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या साथीमुळे ज्यांना अस्वस्थता, भीती, निराशा वाटत असेल अशा लोकांना समजून भावनिक आधार आणि समुपदेशन मनोबल हेल्पलाईनच्या माध्यमातून दिले जाणार आहे. ज्यांना मन मोकळं करण्याची, आधाराची गरज वाटली तर सोबतच्या नंबरवर फोन करावा असे आवाहन डॉ. दाभोलकर यांनी केले आहे.
मराठी आणि हिंदी भाषेतून ही सेवा पुरवली जाईल. महाराष्ट्र
आणि महाराष्ट्राच्या बाहेरील लोकांनादेखील केवळ एक फोन करून ही सुविधा मिळू शकते. ही सेवा मोफत असून आपली माहिती पूर्णपणे गोपनीय राहील. कृपया फोन करण्याच्या आधी समुदेशकाच्या वेळा पहाव्यात असे देखील आवाहन करण्यात आले आहे.
तसेच आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना भावनिक आधार कसा द्यावा याविषयीचे ‘चला भावनिक प्रथमोपचार द्यायला शिकूया’ हे ऑनलाईन प्रशिक्षणदेखील परिवर्तन संस्थेमार्फत आयोजित केले जात आहे. हे प्रशिक्षण घेतलेले लोक स्वत:च्या आणि मित्र मंडळी आणि नातेवाईक यांच्या कोरोना संबधित चिंता, भीती अधिक प्रभावीपणे हाताळू शकतात. ज्यांना हे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यायचे असेल त्यांनी रेश्मा कचरे 9561911320 / योगिनी मगर 9665850769 या क्रमांकावर नावनोदणी करावी. हे प्रशिक्षण पूर्ण मोफत आहे असेदेखील पुढे नमूद केले आहे.
मनोबल हेल्पलाईन
१.राजेंद्र पवार 9421909799 संध्याकाळी ४ ते ६. , २.चंद्रकांत भिसे 7507660111 सकाळी ११ ते ६. , ३.सुनिता भोसले 9552459553 पूर्णवेळ. ,४.राणी बाबर-9923095901 पूर्णवेळ. , ५.योगिनी मगर -9665850769 पूर्णवेळ., ६.रुपाली भोसले-8149278509 पूर्णवेळ., 7. मोरेश्वर देशमुख - 9860414603पूर्णवेळ ., 8.माधुरी आवटे - 9420216505 दुपारी 1 ते 6., 9.श्रुती मधूदीप-8788974365- दुपारी 2 ते 5., 10.नंदिनी जाधव-9422305929 पूर्णवेळ., 11.कृतार्थ शेवगावकर 9823974400 -पूर्णवेळ., 12. राजू इनामदार - 9822917580., 13.नितीन लेले -पूर्णवेळ -9284914172., 14.रेश्मा कचरे :-9561911320-पूर्णवेळ., 15.अर्चना बिरदवडे - 9209834762- वेळ(दुपारी 2 ते संध्याकाळी 7., 16.योगेश बागडे - 9767358855-पूर्णवेळ., 17.रश्मी भुवड- पूर्णवेळ -7350403674., 18. साधना बाजारे -पूर्णवेळ-9011017763., 19.रोहिदास गायकवाड-8698941642पूर्णवेळ., सुनिता देशमुख-7020402352 ( दुपारी 2ते 6)., 21.प्रभाकर नाईक - 7719838747 पूर्णवेळ., 22.प्रिया कदम - पूर्णवेळ-9923886741., 23.अण्णा कडलासकर-9270020621-पूर्णवेळ.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |