01:24am | Jul 16, 2019 |
सातारा : मी अनुभवाला आलं ते लिहिलं. अनुभवाला आलं त्यातील सांगण्यासारखे वाटले ते इमानदारीने लिहिले.कुणाला बरं वाटावे म्हणुन लिहिले नाही. प्रामाणिकपणे वाटले ते लिहिले असे स्पष्ट प्रतिपादन मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि जेष्ठ साहित्यीक व कवी प्रा. फ.म.शहाजिंदे ( लातूर ) यांनी सातारा येथे बोलताना केले.
प्रा. फ.म.शहाजिंदे यांचा सत्कार समारंभ व प्रा. फ.म.शहाजिंदे यांनी लिहिलेल्या " दखलपात्र शब्दांचा उरुस " या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सातारच्या पाठक भवनमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शहाजिंदे बोलत होते. यावेळी इतिहास संशोधक सरफराज शेख , पत्रकार कलिम अजिम , साहिल शेख , प्राचार्य पुरुषोत्तम शेठ , संध्या चौगुले हे मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम मुस्लिम जागृती अभियान व सातारा येथील परिवर्तनवादी संघटना यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
आपलेपणाने मला कुठं उराला लावणारा माणूस भेटला नव्हता. या सर्वच क्षेत्रात दिशादर्शक असलेल्या शहरात ऊराऊरी भेटणारा माणूस भेटला याचा मनाला आनंद वाटला असै सांगुन शहाजिंदे म्हणाले की मराठवाड्यातील खेड्यात राहणाऱ्या एका मुस्लिम माणसाचा सत्कार सातारा येथे होतोय ही आजच्या काळात फार दुर्मिळ गोष्ट आहे. असे प्रसंग माझ्या जीवनात आले नाहीत.. ही संस्मरणीय घटना आहे.
जगाच्या नकाशावर भारताचे नाव न्हेणारे तीन महापुरुष होते स्वामी विवेकानंद , म गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर. हिंदू मुस्लिम समनव्याची भूमिका देशाच्या भल्यासाठी आवश्यक आहे ही भूमिका स्वामी विवेकानंद यांनी मांडली. प्रा शहाजींदे यांनी त्यांच्या लिखाणात हीच भूमिका पुढे नेलेली आहे असे मत डॉ दत्तप्रसाद दाभोळकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
मुस्लिम समाजाचे सामाजिक चारित्र्य इतिहासाच्या माध्यमातून विकृत दाखवले जात आहे असे स्पष्ट प्रतिपादन यावेळी बोलताना इतिहास संशोधक सरफराज शेख यांनी केले आहे. इस्लाम हे डाव्या विचाराचं तत्त्वज्ञान आहे. इस्लामची डावी भुमिका , अंगीभूत डावेपणा स्वामी विवेकानंद यांनी पुढे आणला. याची दखल घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.
स्वागत व प्रास्ताविक मुस्लिम जागृती अभियान चे मुजफ्फर सय्यद यांनी केले. सुत्रसंचालन साहित्यिक व कवी साहिल शेख यांनी केले. यावेळी मुजावर खान , नंदकुमार चोरगे , डॉ. वैशाली चव्हाण , डॉ. अनिमिष चव्हाण , विजय मांडके , दिनकर झिंब्रे , सय्यद गुरुजी , कॉ. किरण माने , सुधीर पवार , प्रा. सुनील गायकवाड , डॉ. राजश्री देशपांडे , मिनाज सय्यद , जयंत उथळे , दिलिप ससाणे , दिलीप गलांडे , अरिफ बागवान , सलिम आतार आदी बहुसंख्येने उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |