04:03pm | Apr 12, 2018 |
सातारा : स्व. यशवंराव चव्हाण यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात विकास पोहचावा यासाठी जाणीवपुर्वक स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती केली. याला आता 58 वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही आज या संस्थेमध्ये संस्थानिक निर्माण झाले. तसेच कामाचा दर्जाही खालवला गेला आहे. याची प्रचिती सातारा जिल्हा परिषदेत पहाण्यास मिळते पण पंचायतराज समितीमुळे सातारा जिल्हा परिषदेतील बेशिस्त व कामचुकारपणा काही काळासाठी अघोषित बंदी घातली होती. दरम्यान पंचायत राज समिती जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, समाजमंदिर, शाळा तसेच जिल्हा परिषदेने केलेल्या कामांची पहाणी करणार असल्याने अनेकांना धडकी भरली आहे.
सातारा जिल्हा परीषदेमध्ये दि. 11 ते 13 एप्रिल या कालावधीत उमरेड जि. नागरपूर येथील भाजपचे आ. सुधीर पारवे यांच्या अध्यक्षतेखाली सध्या 17 विधानसभा सदस्य सातारा जिल्ह्याच्या दौर्यावर आले आहेत. बुधवार दि. 11 रोजी सर्किट हाऊस या ठिकाणी सन्मानिय सदस्यांचे जिल्हा परीषदेच्यावतीने पारंपारिक स्वागत करण्यात आले. त्यानंतर 28 पैकी पंचायत राजच्या 17 सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या छ। शिवाजी सभागृहात प्रश्न उत्तरे व कामकाजाच्या अहवालाची पडताळणी केली. यामध्ये त्रुटी आढळून शालेय खरेदीबाबत दंडात्मक कारवाई केल्याची चर्चा जिल्हा परीषदेच्या परीसरात सुरू झाली. या समितीच्या स्वागतासाठी जिल्हा परिषदेच्या परिसरात अक्षरशा: संसद भवन जसे स्वच्छ असते तशीच स्वच्छता केली होती. चौथ्या मजल्यावर हिरव्यागार कुंड्या जागो-जागी उभ्या केल्या होत्या. तसेच सर्वत्र सुबक अशी रांगोळी काढण्यात आली होती. जिल्हा परीषदेच्या प्रवेश व्दारातच भली मोठी रांगोळी काढून सदस्यांचे स्वागत केले होते. तसेच चौथ्या मजल्यावर आडगळीतील सामान दिसू नये म्हणून त्याच्यावर पडद्याची भिंत उभी केली होती. आणि त्या ठिकाणी कुणी जावू नये म्हणून लाकडी बाकडी लावण्यात आली होती.
13 एप्रिल रोजी पंचायत राज समिती पहाणी केलेल्या कामांचे अवलोकन करणार आहे. सन्मानिय सदस्य व वरीष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख या व्यतीरिक्त 2011 पासून जिल्हा परीषदेशी संबधीत अधिकार्यांना पाचारण करण्यात आले असून काही अधिकार्यांनी अनियमित केलेल्या कामांचा जाब द्यावा लागेल, या भितीने ग्रासले होते. त्यांच्या चेहर्यावर उत्साह दिसत नव्हता. तर जिल्हा परिषदेचे अधिकारी तणावाखाली वावरत असल्याचे निदर्शनास आले. पुर्वी जिल्हा परिषद कर्मचारी हे घोळक्याने चहासाठी बाहेर पडत होते. तसेच काही अधिकारी जेवणाच्या सुट्टीवेळी तीन तीन तास घरी जात होते. आता हेच अधिकारी घरचे कार्य असल्यासारखे समितीच्या पुढे मागे धावत असल्याचे चित्र दिसत होते. या सदस्य व अधिकार्यांच्या बैठकीच्या ठिकाणी कुणालाही प्रवेश देण्यात आला नसल्याने बैठकीत नेमके काय घडलं बिघडलं? याबाबत उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |