06:13pm | Sep 05, 2018 |
सातारा : एकीकडे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या " शिक्षण हक्काची किमया न्यारी ,शिक्षणगंगा आता घरोघरी" हे घोषवाक्य केवळ शाळेच्या भिंतीवरच राहतात कि काय असा प्रश्न खंडाळा तालुक्यातील घाडगेवाडी याठिकाणी असलेल्या परिस्थितीमुळे अनुभवाला येत आहे. घाडगेवाडी येथील जिल्हा परिषद याठिकाणी गेल्या चार महिन्यांपासून नियमित शिक्षक नसल्याने चिडलेल्या ग्रामस्थांनी अचानकपणे विदयार्थ्यांना बाहेर काढत जिल्हा परिषद शाळेला टाळे ठोकले. विशेष म्हणजे घाडगेवाडी ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकूनही खंडाळा गटशिक्षणाधिकाऱ्यानी शाळेला भेट देण्याचेही सौजन्य न दाखवल्याने घाडगेवाडी ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. एकूणच शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला घाडगेवाडी ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनामुळे खंडाळा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाची लक्तरे वेशीला टांगली गेली आहे.
खंडाळा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये मांढरदेव डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या व स्त्री शिक्षणाची कवाडे उघडी करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळापासून काही अंतरावर असलेल्या घाडगेवाडी हे गाव जेमतेम ५०० लोकवस्तीचे गाव आहे. याठिकाणी सातारा जिल्हा परिषदेच्या मालकीची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. दरम्यान,याठिकाणी पहिली ते चौथीचे वर्ग असून सध्या ९ विद्यार्थी याठिकाणी शिक्षण घेत आहे. यावेळी जिल्हा परिषद शाळा सुरु झाल्यापासून याठिकाणी दोन शिक्षक असणाऱ्या शाळेमध्ये एका शिक्षकाची नियमित बदली तर एका शिक्षकांचे निधन झाल्याने याठिकाणी खंडाळा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून दररोज एका शाळेतील शिक्षक याठिकाणी शिकवण्यासाठी देत असल्याचा आरोप घाडगेवाडी ग्रामस्थांनी केला आहे.
घाडगेवाडी जिल्हा परिषद शाळेसाठी नियमित शिक्षकांची नेमणूक करावी याबाबतची मागणी गेल्या चार महिन्यांपासून घाडगेवाडी ग्रामस्थ खंडाळा पंचायत समितीच्या अधिका-यासह लोकप्रतिनिधीकडे करूनही केवळ आश्वासनापलीकडे ग्रामस्थांच्या हाती काही लागू न शकल्याने आज संतापलेल्या ग्रामस्थांनी अचानकपणे शाळेमधील विद्यार्थी - विद्यार्थिनींना बाहेर काढत शाळेला टाळे ठोकले. यावेळी घाडगेवाडी याठिकाणी आलेल्या खंडाळा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी गजानन आडे,नायगाव केंद्रप्रमुख शाहजहानबी शेख यांना संतापलेल्या ग्रामस्थांनी घेराव घालत प्रश्नांची अक्षरशः सरबत्ती केली. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी गजानन आडे, केंद्रप्रमुख शाहजहानबी शेख यांनी घाडगेवाडी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता ग्रामस्थांनी खंडाळा गटशिक्षणाधिकारी यांनी लेखी दिल्याशिवाय व शिक्षकांची नेमणूक केल्याशिवाय शाळेला लावलेले कुलूप काढणार नसल्याचा पवित्रा घेतला.
विशेष म्हणजे घाडगेवाडी याठिकाणी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप लावल्याचे समजूनही खंडाळा गटशिक्षणाधिकारी यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी न येता ग्रामस्थांनीच सहकार्य करावे असे पत्रकारांकडे सांगत मुक्ताफळे उधळली.विशेष म्हणजे घाडगेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे वीज बिल गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून थकीत राहिल्याने वीज कंपनी विभागाने शाळेची वीजही तोडली असल्याने याठिकाणी दररोज येणाऱ्या शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे याठिकाणी मोठ्या प्रमाणात गवताचे व झाडाझुडपांच्या साम्राज्य पसरल्याने विद्यार्थी-विदयार्थीनीना विशेषतः अंगणवाडीमधील लहानग्यांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे. विशेष म्हणजे संबंधित जिल्हा परिषद शाळा हि घाडगेवाडी गावापासून अंदाजे अर्धा किलोमीटर अंतरावर बांधण्यात आली आहे. त्यामुळे याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास याला जवाबदार कोण असा प्रश्न संतापलेल्या घाडगेवाडी ग्रामस्थांनी शिक्षणविस्तार अधिकारी गजानन आडे, केंद्रप्रमुख शाहजहानबी शेख यांना विचारत संबंधितांना धारेवर धरले . दरम्यान,गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कोणतेही लेखी आश्वासन न दिल्याने ग्रामस्थांनी शाळेचे टाळे न काढण्याचा पवित्रा घेतला. यावेळी विद्यार्थ्यांना शाळेला सुट्टी दिल्याने विद्यार्थी हे घरी परतले.
दररोज शिक्षक नवा .. विद्यार्थ्यांचा अभ्यास नवाकोरा
घाडगेवाडी याठिकाणी गेल्या चार महिन्यांपासून शिक्षक नसल्याने शिक्षण विभागाकडून उपाययोजना म्हणून दररोज नवीन शिक्षक याठिकाणी देण्यात येत असल्याचा आरोप घाडगेवाडी ग्रामस्थांनी केला. त्यामुळे सारे शिकूया .. पुढे जाऊया हा शिक्षण विभागाचा प्रचाराचे शिर्षक सार्थकी लागणार का? असा प्रश्न विचारात ग्रामस्थांनी खंडाळा शिक्षण विभागाच्या अजब प्रकारच्या गजब नमुन्याच्या दररोज शिक्षक नवा.. विद्यार्थ्यांचा अभ्यास नवाकोरा हा प्रचाराचा शिर्षक खंडाळा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे उदयाला आल्याचा आरोप घाडगेवाडी ग्रामस्थानी केला आहे.
एकाच वर्गात पहिली ते चौथीचे विद्यार्थी
घाडगेवाडी याठिकाणी पहिली ते चौथी असे वर्ग असून शिक्षकाची नेमणूक करण्यात येत नसल्याने त्याठिकाणी विद्यार्थी यांना शिकवण्यासाठी एकत्रित करत एकाच वर्गात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना येणारे शिक्षक अध्यापनाचे धडे देत असल्याने शिक्षणाची दहिमिसळ होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून शिक्षणाचे तीन तेरा वाजल्याने येथील काही ग्रामस्थांनी शाळेतील विद्यार्थी इतर ठिकाणच्या शाळेमध्ये घातले आहे अशी माहिती घाडगेवाडी ग्रामस्थांनी दिली आहे.
घाडगेवाडी याठिकाणी शासनाच्या तांत्रिक अडचणींमुळे शिक्षकांची नेमणूक करता आलेली नाही. त्यामुळे त्याठिकाणी विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी दुसऱ्या शाळेमधील शिक्षक हे अध्यापनासाठी पाठविण्यात येत होते मात्र तेथील ग्रामस्थांनी विरोध केल्याने आजपासून तात्पुरत्या स्वरूपात बावडा येथील अतिरिक्त शिक्षक यांची नेमणूक घाडगेवाडी याठिकाणी करण्यात येत असल्याचा आदेश दिला असल्याचा माहिती पत्रकारांना दिली.
अलका मुळीक - गटशिक्षणाधिकारी ,खंडाळा पंचायत समिती
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |