06:58pm | Jun 04, 2018 |
सातारा : शिवसेना आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक संपूर्ण ताकदीने स्वबळावर लढणार आणि तेवढ्याच ताकदीने जिंकणार , असा विश्वास शिवसेना उपनेते व सातारा जिल्हा संपर्क प्रमुख नितीन बानगुडे यांनी व्यक्त केला.
फलटण व माण विधानसभा क्षेत्रातील उमेदवार संपर्क व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन नुकतेच फलटण येथे आयोजित करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. त्यावेळी जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, खटाव तालुकाप्रमुख युवराज पाटील, माण तालुकाप्रमुख रामभाऊ जगदाळे व बाळासाहेब मुलाणी तसेच फलटण तालुकाप्रमुख राहुल देशमुख व स्वप्निल मुळीक, फलटण शहरप्रमुख सचिन बिडवे आणि कोरेगाव उत्तर तालुका प्रमुख संतोष सोळस्कर तसेच फलटण विधानसभा संपर्कक्षेत्र प्रमुख सचिन भिसे आदी. पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
पुढे बोलताना बानगुडे पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा व दोन्ही लोकसभा मतदार संघात स्वबळावर लढण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने तयारीला लागावे. शिवसेनेचे विचार घर घरापर्यंत पोहचवून दोन्ही निवडणुकांमध्ये यश प्राप्त करण्यासाठी आता शिवसैनिकांनी जीवाचे रान करण्याची गरज आहे. शिवसैनिकांना लागेल ती मदत देण्यात येईल परंतु 1995 व 96 चा इतिहासाची पुनरावृत्ती सातारा जिल्हयात करून केंद्रात व राज्यात सेनेचा भगवा मनाने डौलताना दिसला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी एकत्र होऊन प्रयत्न करूया, असे बानगुडे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव म्हणाले, शिवसैनिकांनी जिल्हयात दोन्ही राजांच्या चालू असलेल्या वस्त्रहरणाकडे लक्ष न देता खऱ्या अर्थाने छत्रपतींच्या विचारावर सामाजिक कार्य करणाऱ्या शिवसेना संघटनेच्या वाढीसाठी प्रयत्न करावेत. शिवसेना ही सर्व सामान्य व गोरगरीब घरातील मावळ्यांची संघटना आहे. शिवसेनेचा इतिहास व वर्तमानकाळ पहिला तर सर्वसामान्य घरातील व्यक्ती व युवकांना विशेषतः जात-पात न मानता मुख्यमंत्री, महापौर, खासदार, आमदार पदापर्यंत पोहचविण्याचे काम उभ्या महाराष्ट्रात फक्त शिवसेनेने केलेले आहे. त्यामुळे आता येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतून तसेच भाजपमधून देखील पदाधिकारी व कार्यकर्ते येत्या काही दिवसात शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.
मेळाव्यास फलटण, कोरेगाव उत्तर, माण व खटाव तालुक्यातून बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |