04:29pm | Aug 23, 2018 |
सातारा : महाराष्ट्रात काही लोकांकडून जातीय भिंती उभ्या करून समाजामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्राला एकसंघ ठेवण्याचे सामर्थ्य संत परंपरेतील विचारात असून ते विचार आचरणात आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
सातारा येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात गुंफण अकादमी व यशवंतराव चव्हाण विचार मंचतर्ङ्गे आयोजित पुस्तक प्रकाशन व गुंफण गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. सबनीस अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, ग्रामीण कथाकार बबन पोतदार, कराड अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, कराड अर्बन बँकेचे चेअरमन डॉ. सुभाषराव एरम, मसूरच्या सरपंच सुनीता मसूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य रमणलाल शहा लिखित ‘आम्ही जिंकिला संसार’ व डॉ. बसवेश्वर चेणगे लिखित ‘प्रश्नवेध’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. प्राचार्य शहा यांचा ८५ व्या वाढ दिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. तसेच याप्रसंगी कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव, संगम उद्योग समूहाचे बाळासाहेब कुलकर्णी, राज्य शिक्षक संघाचे संपर्कप्रमुख सिध्देश्वर पुस्तके, सामाजिक कार्यकर्ते कल्याण कांबिरे, वास्तुशास्त्र अभ्यासक नेहा शहा व गेवराई (जि. बीड) येथील प्रसिध्द वक्ते रामानंद तपासे यांना गुंफण गुणगौरव पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे बनून प्रत्येक विरोधकाचे मन जिंकले पाहिजे, तर कॉंग्रेस कार्यकर्त्याने हिमालयाच्या रक्षणासाठी धावून जाणार्या सह्याद्रीसारखे म्हणजेच स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे बनले पाहिजे, असे मत डॉ. सबनीस यांनी देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना व्यक्त केले.
गुंफण अकादमीचे पुरस्कार ही मराठी संस्कृतीची सुंदर गुंफण आहे. अकादमीने पुरस्कारासाठी कोणत्याही एका जाती धर्मातील व्यक्तीला न निवडता संपूर्ण समाजाचे प्रतिबिंब दिसेल अशा सर्व समाजातील व्यक्तींची निवड केली हे महत्त्वपूर्ण आहे. त्याद्वारे अकादमीने समाजातील सर्व जातीधमारचा गुणगौरव करून सांस्कृतिक बेरीज साधली आहे. डॉ. चेणगे प्राचार्य रमणलाल शहा यांच्याबद्दल गुरूवर्य असा आदराने उल्लेख करतात तर प्राचार्य शहा डॉ. चेणगे माझे मित्र असा उल्लेख करतात यातच या सोहळ्याचे मोठेपण पहावयास मिळते, असे उद२गार त्यांनी काढले.आजच्या व्हॉटस२ ऍपच्या जमान्यात पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमास झालेली अलोट गर्दी आश्चर्यचकित करणारी असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी प्राचार्य शहा व डॉ. चेणगे यांच्या साहित्यकृतींचे कौतुक केले. प्राचार्य शहा यांचा अभ्यास, व्यासंग व त्यांनी संत साहित्यावर केलेले चिंतन उल्लेखनीय आहे. समाजासाठी त्यांचे साहित्य मार्गदर्शक व प्रेरक आहे, असे त्या म्हणाल्या. यावेळी मिलिंद जोशी, बाळासाहेब कुलकर्णी, सीए दिलीप गुरव, नेहा शहा यांनीही मनोगत व्यक्त केले. चंद्रकांत कांबिरे यांचा यावेळी न्यायालय अधीक्षकपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.८५ व्या वाढदिवसानिमित्त प्राचार्य शहा व गुंफण पुरस्कार विजेत्यांचा कराड अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, डॉ. सुभाषराव एरम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने संचालक प्रकाश बडेकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी केले. यशवंतराव चव्हाण विचार मंचचे नितीन शहा यांनी स्वागत, तर चंद्रकांत कांबिरे यांनी सूत्रसंचालन केले. सुजीत शेख यांनी आभार मानले. प्रारंभी माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना सभागृहाच्यावतीने दोन मिनिटे स्तब्धता पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
...हे तर सरकारच्या कार्यशून्यतेचे उदाहरण !
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, गौरी लंकेश, एम. एम. कलबुर्गी यांच्यासारख्या विवेकवादी लोकांची हत्या करून महाराष्ट्रातील विवेक संपविण्याचे षडयंत्र राबवले जात आहे. केवळ त्यांचे मारेकरी पकडून हा प्रश्न संपणार नाही, तर हा प्रश्न सोडविण्यासाठी या हत्याकांडामागचा मास्टर माइरड पकडणे महत्त्वाचे आहे, असे डॉ. श्रीपाल सबनीस या कार्यक्रमात म्हणाले. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर कर्नाटक पोलिसांना गुन्ह्याचा जो उलगडा झाला तो महाराष्ट्रातील पोलिसांना का झाला नाही असा सवाल करून, कर्नाटक पोलिसांच्या तपासावरून डॉ. दाभोलकर यांच्या मारेकर्यांना पकडावे लागते हे पोलिसांच्या व महाराष्ट्र सरकारच्या कार्यशून्यतेचे उदाहरण आहे, अशी खरमरीत टीका त्यांनी केली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |