सातारा : सातारा मध्यवर्ती बसस्थानकामध्ये एसटीत बसत असताना गर्दीचा गैरफायदा घेवून अज्ञाताने साडेपाच तोळे वजनाचा सोन्याचा ऐवज लांबवला. चोरीची घटना समोर आल्यानंतर महिलेने दागिने शोधण्याचा प्रयत्न केला मात्र चोरट्यांनी ते हातोहात लांबवले.
सौ.जयश्री विकास शिवणकर (वय ३५, रा.संगमनगर, सातारा) यांनी याबाबतची शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १२ रोजी दुपारी ५ वाजता तक्रारदार जयश्री शिवणकर या वेणेगावला जाण्यासाठी फलाटावर थांबल्या होत्या. सातारा-पाटण ही एसटी आल्यानंतर प्रवाशांची गर्दी झाली. याच गर्दीचा गैरफायदा घेवून अज्ञात चोरट्याने तक्रारदार यांच्या पर्समधील दोन तोळ्याचे गंठण, सव्वा तोळ्याचे नेकलेस, दोन तोळ्याचे मंगळसूत्र, अर्ध्या तोळ्याची वेल, सोन्याची नथ व रोकड असा ऐवज लांबवला. हे सर्व दागिने सुमारे १ लाख रुपये किंमतीचे आहेत.
चोरीची घटना समोर आल्यानंतर तक्रारदार यांनी आरडाओरडा केला. यामुळे घटनास्थळी गर्दीही झाली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन तत्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासले मात्र एक एसटी आडवी आल्याने त्यामध्ये चोरटे कैद होवू शकले नाहीत. याच गर्दीतून चोरट्यांनी पलायन केले. यावेळी चोरीच्या घटनेनंतर इतर प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |