04:01pm | Jan 22, 2020 |
सातारा : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी रस्ते उभारणीच्या बाबतीत भलतेच आग्रही असतात. ठरलेल्या वेळेत महामार्गाची कामे उरकलीच पाहिजेत, हा त्यांचा शिरस्ता आहे. परंतू त्यांचा हा शिरस्ता मात्र जनसामान्यांच्या जिवावर उठलेला आहे. जावली तालुक्यातील केंजळ येथील बेकायदेशीर स्टोन क्रशरवर कारवाई करणार्या प्रदुषण मंडळातील एका वरिष्ठ अधिकार्याला नितीन गडकरींच्या कार्यालयातून फोनवर डोस देण्यात आला आहे. त्यामुळे गडकरी साहेब, सिमेंट महाग झाले म्हणून मुडदे पाडून रस्ते बनवणार काय? असा प्रश्नही सातार्यातील पर्यावरणप्रेमी करीत आहेत.
महाड-पंढरपूर या महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. नियोजित वेळेत हे काम पूर्ण व्हावे यासाठी राज्य शासनासह भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयही आग्रही आहे. हे काम गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. पोलादपूर-सातारा हे काम सातार्यातील ब्लॅक लिस्टमध्ये गेलेला एक ठेकेदार करीत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रधान सचिवच या महामार्गाच्या कामात भागीदार असल्यामुळे या कामासाठी जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच रेड कार्पेट टाकले होते. या महामार्गासाठी लागणार्या अनेक परवानग्या एका दिवसातच सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आल्या होत्या. यापैकी एक म्हणजे केंजळ, ता. जावली येथील स्टोन क्रशर सातार्यातील बांधकाम ठेकेदार गडोख काम करीत असलेल्या सातारच्या माजी पालकमंत्र्यांच्या मालकीचे असलेल्या रोडवेज सोल्युशन प्रा. लि. आहे. सुरुवातीला गडोखने माजी पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरुन गौण खनिजाची रॉयल्टी म्हणून फक्त एक कोटी रुपये सातारा महसूल विभागाकडे भरलेले होते. मात्र हे पैसे भरल्यानंतर गडोखने एक कोटीच्या बदल्यात सुमारे पन्नास कोटींपेक्षा जास्त रकमेच्या गौण खनिजाचे उत्खनन केले आहे. तसेच महाराष्ट्र प्रदुषण नियामक मंडळाने घालून दिलेल्या अटींचेही उल्लंघन केल्यामुळे हा स्टोन क्रशर तत्काळ बंद करण्यात यावा, असे आदेशही सातारा प्रदुषण नियामक मंडळाने सातारा महसूल विभागाला दिले होते. परंतू तत्कालीन जिल्हाधिकार्यांनी प्रदुषण मंडळाच्या नोटीशीला केराची टोपली दाखवून गडोखच्या त्या स्टोन क्रशरवर कारवाई केली नाही. मात्र प्रदुषण मंडळाने याबाबत वीज वितरण कंपनीशी पत्रव्यवहार करुन त्या स्टोन क्रशरचे वीज कनेक्शन तोडले. मात्र गडोखने मोठमोठाल्ले जनरेटर लावून अवैध स्टोन क्रशरचे काम सुरुच ठेवलेले आहे. सातारा महसूल विभागाने केंजळ येथील स्टोन क्रशरबाबत शेपट्या घातल्यानंतर प्रदुषण मंडळाने याबाबत दिलेरी दाखवत गडोखला केळघरचा घाट दाखवला. मात्र, गडोखबाबत कठोर भूमिका घेणार्या सातारा येथील प्रदुषण मंडळाच्या अधिकार्यांनाच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून धमकीवजा डोस देण्यात आला असून त्या क्रशरवर कारवाई केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा दम भरल्यामुळे त्या अधिकार्याला धडकी भरली असून नको ते झंझट पाठिमागे नको म्हणून त्या क्रशरबाबत न बोललेलेच बरे, अशी भूमिका त्या अधिकार्याने घेतलेली आहे. नुकतेच ना. नितीन गडकरी यांनी मराठवाड्यात रस्त्याच्या कामात टक्केवारी मागणार्या लोकप्रतिनिधी विरोधात सीबीआयकडे तक्रार दाखल केलेली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच सातार्यातही प्रदुषण नियामक महामंडळाच्या अधिकार्याला गडकरी यांच्या कार्यालयातून धमकी देण्यात आल्यामुळे सातार्यात खळबळ उडालेली आहे.
शिवसेना- कॉंग्रेस व राष्ट्रवादीने राज्यात सरकार स्थापन करीत भाजपला सत्तेपासून रोखल्यामुळे भाजपचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडण्याच्या मार्गावर आहेत. असे असताना भाजपने आपल्या केंद्रीय शक्तीस्थानांचा वापर करण्यास सुरुवात केलेली आहे. मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींवर सीबीआयची कारवाई तसेच अवैध स्टोन क्रशरवर कारवाई करणार्या विभागाला दिलेल्या धमकीमुळे अनेकांचे इंटरेस्ट यानिमित्ताने उघड झाले आहेत. नुकतेच औरंगाबाद येथील खंडपीठाने अवैध स्टोन क्रशरबाबत कडक भूमिका घेत महसूल विभागाला याबाबत तक्रार आल्यास चार आठवड्यांच्या आत संबंधित स्टोन क्रशरवर जप्तीची कारवाई करुन क्रशर चालकावर फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच त्या क्रशरवरील साहित्याची लिलाव प्रक्रिया करण्याचे आदेश दिले होते. मात्र सातारा जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी हा आदेश फाट्यावर मारुन न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केलेली आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात केंजळ स्टोन क्रशरसह जिल्ह्यातील अनेक स्टोन क्रशरबाबत असंख्य तक्रारी आल्या आहेत. असे असतानाही सातारा महसूल विभागाने या तक्रारींकडे कानाडोळा केलेला आहे. त्यामुळे नूतन जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी या प्रकरणात लक्ष घालून केंजळ येथील स्टोन क्रशरसह जिल्ह्यातील इतर अवैध स्टोन क्रशरवरही कारवाई करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
सातारा-पुणे महामार्गाबाबत अनास्था दाखवणारे गडकरी 'गडोख' बाबत मात्र आग्रही
सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गाची सध्या दयनीय अवस्था झालेली आहे. ठिकठिकाणी चालू असलेले निर्माणाधीन उड्डाणपुलांची कामे, रस्त्यात पडलेले खड्ड्यांमुळे वाहनचालक, प्रवासी जीव मुठीत धरुन प्रवास करीत आहेत. याबाबत ना. गडकरींच्या भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र या तक्रारींनाही गडकरींच्या मंत्रालयाने केराची टोपली दाखवत आनेवाडी व खेड शिवापूरच्या टोल नाक्यावर टोलची वसुली जोरात सुरु आहे. परंतू जिल्ह्यात सुरु असलेल्या इतर महामार्गांच्या कामात मात्र गडकरींच्या मंत्रालयाचे जातीने लक्ष आहे. अनेक ठिकाणी जिल्ह्यात रस्त्यांच्या कामांसाठी स्टोन क्रशरना परवानग्या देण्यात आल्या आहेत. मात्र रस्ते बांधकाम ठेकेदारांकडून अनेक नियम धाब्यावर बसवून स्टोन क्रशर सुरु आहेत. सिमेंट महाग झाले म्हणून गडकरींचे मंत्रालय लोकांना मारुन रस्त्यात पुरणार काय? असाही प्रश्न जिल्ह्यातील पर्यावरणवादी नितीन गडकरींना विचारत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |