07:52pm | Apr 20, 2018 |
सातारा : फलटण तालुक्यातील इतर गावाप्रमाणे वेळोशी हेही अवर्षणग्रस्त गाव.... १९७२ च्या दुष्काळात एक गाव तळे झालेले ... नंतर अनेक पावसाळे आले गेले आणि गाव तलाव गाळानी सपाट झालेला. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेने गावकऱ्यांच्या एकीला बळ मिळाले. दि १९ रोजी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल थेट वेळोशीच्या तळ्यात आल्या ... आणि आवाहन केले चला ही संधी आहे, गाळ काढू या ... प्रशासन तुमच्या सोबतीला आहे. ७२ साली निर्माण झालेल्या तळ्यात आपण उभे आहोत तिथे पुढच्या वर्षी या दिवशी पाणी दिसले पाहिजे एवढा जलसाठा निर्माण करु या ... हे जलसाठे विकासाचे स्त्रोत आहेत याची जाणिव ठेवू या ...लोकांनी होकार भरला आणि हमी दिली ३० हजार घनमीटर गाळ काढू ... वेळोशी पाणीदार करु ... यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुनिल बोरकर , प्रांत संतोष जाधव , लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शिवदास, अनुलोमच्या सुजाताताई मराठे , जि. प. सदस्य सौ. जिजामाला निंबाळकर, तहसिलदार विजय पाटील, अनुलोमचे स्वयंसेवी संघटनेचे चंद्रकांत पवार उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात आता पर्यंत गाळमुक्त धरण गाळ युक्त शिवार या अभियानांतर्गत ९२ कामाला मंजूरी दिली असून २७ कामाला सुरुवात झाली आहे. वेळोशी सारख्या गावाचे हे गाळ उपसण्याचे काम बघून इतर गावातील लोकही आमच्याकडे येतील एवढे चांगले काम हे होणार आहे. जलसंधारण आता लोकचळवळ झाली आहे ... लोक आता जलसंधारणाच्या कामासाठी आग्रही आहेत. गेल्या दोन वर्षात पडलेल्या पावसामुळे जिथे जिथे जलसंधारणाची कामे झाली त्याचे खुप अनुकूल परिणाम दिसायला सुरुवात झाल्यानंतर इतर गावांनाही आमच्या गावातही लोकसहभागातून जलसंधारणाची कामे का होणार नाही, ही भावना वाढीस लागत असून त्यातून अधिक एकोप्याने आणि संघटीतपणे गावच्या गावे यात जीव ओतून काम करत आहेत. प्रशासनही त्यांच्या सोबत राहून त्यांना मदत करत असल्याचे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |