12:28am | Sep 05, 2018 |
कोरेगाव : किसनवीर सहकारी साखर कारखान्याला आठ ते नऊ महिन्यापूर्वी ऊस गळीतासाठी देवूनही अद्याप कोरेगाव तालुक्यातील ऊस उत्पाकांना किसनवीर कारखान्याच्या व्यवस्थापनाने शेतकर्यांची बिले त्वरित मिळावीत या मागणीसाठी कोरेगाव शहर परिसरातील संतप्त ऊस उत्पादक शेतकर्यांनी किसनवीर सह. साखर कारखान्याच्या कोरेगाव शहरातील जळगावनाका परिसरातील ऑफिसमध्ये ठिय्या आंदोलन केले.
दोन दिवसात कोरेगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांची संपूर्ण उसाची बिले किसनवीर सह. कारखान्याच्या व्यवस्थापनाने दिली नाहीत. तर कारखान्याच्या कोरेगाव शहरातील गट ऑफिसला टाळे ठोकले जाईल आणि कोरेगाव तालुक्यात शेतकर्यांचे मोठे जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा कोरेगाव परिसरातील शेतकर्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी, किसनवीर सह. साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कोरेगाव तालुक्याचा समावेश असल्याने दरवर्षीप्रमाणे जवळपास 60 हजार सभासद शेतकर्यांनी 2017-2018 च्या गळीत हंगामासाठी कोरेगाव तालुक्यातील ऊस गाळपासाठी दिला. किसनवीर सहकारी साखर कारखान्याने प्रतिटनासाठी 2727 रूपये ऊसदर जाहीर केला. मात्र गाळपासाठी साखर कारखान्यास ऊस देवून 8 ते 9 महिने उलटूनही कसलेच ऊसबील किसनवीर साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने कोरेगाव तालुक्यातील शेतकर्यांना अदा केले नाही. कोरेगाव तालुक्यातील बहुसंख्य शेतकर्यांचा उदरनिर्वाह ऊस शेतीवरच अवलंबून आहे. किसनवीर सह. साखर कारखान्याने एफआरपीनुसार जाहीर केलेली रक्कमदेखील आजअखेर शेतकर्यांना दिली नाहीत. त्यामुळे शेतकर्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे.
गेले वर्षभर किसनवीर कारखान्याने उसाची बिले शेतकर्यांना न दिल्याने शेतकर्यांवर फार मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्यांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता कोरेगाव शहरातील किसनवीर कारखान्याच्या गट कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. तसेच दोन दिवसात बिले न दिल्यास कोरेगाव किसनवीर कारखान्याच्या कोरेगाव येथील गट कार्यालयास टाळे ठोकून जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे ऊस उत्पादक शेतकर्यांनी तहसीलदार किर्ती नलवडे, कोरेगावचे पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांना दिले. या ठिय्या आंदोलनामध्ये उदयसिंह बर्गे, वसंतराव बर्गे, दत्तात्रय बर्गे, बुवासाहेब बर्गे, बाळासाहेब बर्गे, चंद्रकांत बर्गे, विजय बर्गे, जितेंद्र बर्गे, शशिकांत बर्गे, आनंदराव बर्गे, राजेंद्र जगदाळे, किरण जगदाळे, मच्छिंद्र बर्गे, हणमंत काटे, फत्तेसिंह बर्गे, रोहन बर्गेसह कोरेगाव तालुक्यातील असंख्य शेतकरी सहभागी झाले होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |