12:03am | Oct 01, 2018 |
वाई: विकास कौशल्य विभागाअंतर्गत वाईत सुरू असलेल्या बहुचर्चीत व्हेक्शनल ट्रेनिंग सेंटरची बोगसगिरी उघड झाल्यावर पहिली कृष्णाई व आता साक्षी स्कील डेव्हलपमेंट व चैत्राली ट्रेनिंग इन्स्ट्युटयुट या नवीन नावाने सध्या वाईत सुरू असलेल्या दोन केंद्राच्याही कार्यपध्दतीवर संशय व्यक्त होत असतानाच शनिवारी माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहिती नंतर धक्कादायक गोष्टी पुढे आल्या आहेत. जी माहिती मागवली गेली त्यापैकी काही महत्त्वाची माहिती दिली गेली नाही. आणि जी दिली त्यामध्ये काही नियमबाह्य कागदपत्राचा समावेश आहे. या दोन्ही केंद्राच्या फाईलमध्ये असंख्य त्रुटी असताना कोणाच्या ' मेहरबानीने ' व्हीटीपी परवाना मिळवला गेला ? याविषयी आश्चर्य ही व्यक्त करण्यात येत आहे. ' सातारा टुडे ' या याही दोन केंद्राच्या बोगसगिरीचा पर्दाफाश करणार असुन राजरोसपणे सुरू असलेल्या या केंद्रांना सहकार्य करणाऱ्या सातारच्या विकास कौशल्य विभागाच्या ' त्या ' अधिका-यांची नावे ही लवकरच प्रसिद्ध करणार आहे.
सोन्याच अंडी देणारी कोंबडी म्हणुन आता व्हेक्शनल ट्रेनिंग प्रोग्रँमकडे पाहिले जाऊ लागलं आहे. शासन दरवर्षी लाखो रूपये या ट्रेनिंग सेंटरला देत असतं. मात्र शासन स्तरावरून कसलाही वचक यावर नसल्याने ' आंधळ दळतय कुत्र पीठ खातयं ' अशी अवस्था या विभागाची झाली आहे. कसलाही तांत्रिक गोष्टीची पुर्तता न करता वशिला व आर्थिक तडजोडी यातुन 'व्हीटीपी' परवाने दिले जात आहेत. हे माहिती अधिकारातुन स्पष्ट झाले आहे. तपासणीसाठी येणा-या अधिका-यांना आधीच ' मॅनेज ' करून योग्य अहवाल तयार करून घेतले जात आहे. हे आता या वाईतील तीन घटनावरून स्पष्ट झाले आहे.
कृष्णाई बहुउद्देशीय केंद्र चालु असताना बायोमॅट्रीक मशिनमध्ये फेरफार करून एक - दोन विद्यार्थ्याची उपस्थिती असताना ती मशिनमध्ये ९० इतकी दाखवुन तेवढ्या विद्यार्थ्यांचे पैसे या केंद्राने लाटले आहेत. गेली दोन वर्षे हा धक्कादायक प्रकार वाईत सुरू होता. उपसंचालकांनी प्रत्येक्ष भेट देऊन वाईतील या केंद्राच्या बोगसगिरीचा ' आखों देखा हाल ' पाहिल्यावर त्यानी या कृष्णाईची देय रक्कम रोखण्याची व काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले आहेत.
याच पार्श्वभूमीवर सध्या वाईत सुरू असलेल्या साक्षी व चैत्राली या दोन केंद्राच्या कार्यपध्दतीवर ही संशय व्यक्त केला जात होता. कृष्णाई केंद्र चालवणा-या ' त्या ' दोन महिलांची माहिती माहिती अधिकारात मागवल्यानंतर त्या दोघींची वैयक्तिक कसलीही शैक्षणिक प्रमाणपत्र दिली गेली नाहीत. ज्या महिलेचं दहावीचं प्रमाणपत्र जोडलं गेलं होतं ती महिलाच अस्तित्वात नसल्याचेही उघड झाले आहे. अन्य प्राप्त कागदपत्रात ही गोलमाल आढळुन आले आहेत. आज कृष्णाई काळ्या यादीत गेली आहे.
आज याच 'त्या ' दोन महिला साक्षी व चैत्राली या दोन वेगवेगळ्या ठिकाणी 'व्हिटीपी' परवाना मिळवुन ट्रेनिंग सेंटर चालवत आहेत. कृष्णाई ऐवजी त्यानी या दोन नावांने केंद्र सुरू केल्याने व यापूर्वी प्राप्त झालेल्या माहितीवरून इंथेही बोगसगिरी चालत असल्याचा संशय आल्याने माहितीच्या अधिकारात एक सामाजिक कार्यकर्त्याने माहिती मागवली होती. त्यामध्ये केंद्र चालवण्यासाठी लागणा-या तांत्रिक गोष्टीची पुर्तता केली नसल्याचे आढळुन आले आहे. साक्षी केद्र ज्या इमारतीत चालवले जाते ते तिस-या मजल्यावर असुन एका पत्र्याच्या शेडमध्ये असुन याबाबत वाई नगरपालिकेतुन माहिती घेतली असता त्या इमारतीला तिस-या मजल्याची परवानगी नसल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. या अर्थ आत्ताचे उभे शेड हे अनधिकृत असल्याचे उघड झाले आहे. केंद्र चालकांने फाईलला जोडलेला नकाशा एका अर्किटेक्टने तयार केलेला आहे. त्यामध्ये सुध्दा फक्त दोनच मजल्याचे डिजाईन आहे.
वास्तविक नियमाने विकास कौशल्य विभागाकडे द्यावा लागणारा नकाशा हा नगरपालिकेने मंजुर केलेला नकाशा देणे बधंनकारक आहे. पण जोडला गेला आहे. तपासणी करणा-या अधिका-याच्या हे का लक्षात आले नाही ? याच आश्चर्य आहे. केंद्रचालकाची शैक्षणिक प्रमाणपत्र माहिती अधिकारात मागवली गेली होती. ती मिळु शकली नाहीत. याचा अर्थ केंद्रचालकाने ब्युटीपार्लर व अन्य व्यावसायिक कोर्सेसचे शासनमान्य शिक्षण घेतलं नसल्याचे आता उघड झाले आहे. दहावी अथवा बारावीचेही प्रमाणपत्र जोडले गेले नाही. परिक्षार्थीना शिक्षण देण्यासाठी जी महिला शिक्षकेची नियुक्ती केली आहे ती वाईतील असल्याचे दाखवण्यात आले आहे. तिचे दहावीचे व अन्य दोन प्रमाणपत्र जोडली गेली आहेत. मात्र ती शिक्षिका प्रत्यक्षात नसल्याची माहिती मिळत आहे. प्रशिक्षणासाठी लागणारे साहित्य हे पुरसे नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.
तीच परिस्थिती चैत्राली ट्रेनिंग सेंटरची आहे. या केंद्रचालक महिलाची शैक्षणिक प्रमाणपत्र माहिती अधिकारात मागवली गेली होती ती मिळाली नाहीत. त्यामुळे संबंधित माहिलीच्या शैक्षणिक गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्या इमारतील केंद्र चालवले जाते. त्या इमारतीचा नगरपालिका मंजुर नकाशा न जोडता तो कोणाकडे तरी तयार करून घेतलेला दिसत आहे. ज्या शिक्षकेची प्रशिक्षण देण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे ती शिक्षिका लातुरची असल्याचे दाखवण्यात आली आहे. प्रत्यक्षात ती या केंद्रावर नाहीच. या दोन्ही केंद्राकडे 'बायोमॅट्रीक' मशिन आहेत का ? याबाबत अद्याप माहिती मिळाली नसुन दोन्ही केद्रांवर किती महिलांना प्रशिक्षण दिले जाते याचीही माहिती दोन दिवसात उपलब्ध केली जाणार असुन त्यामध्ये काय घोळ केला आहे ते सातारा टुडे लवकरच उजेडात आणणार आहे.
माहितीच्या अधिकारातुन एक स्पष्ट झाले आहे की कृष्णाई सारखीच वाईतील ही दोन्ही केंद्र नियबाह्य पध्दतीने चालवून शासनाचे लाखो रूपये लुटले जात आहेत. त्यांना साताऱ्यातील व त्याचे वरीष्ठ सहकार्य करीत असल्याचेही आता उघड झाले असुन यामध्ये मोठं 'रॅकेट' सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
बोगसगिरीच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका
या बोगसगिरीच्या विरोधात जेष्ठ पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते शिवाजी राऊत फौजदारी खटला दाखल करणार असुन महाराष्ट्रात सुरू असलेल्या या बोगसगिरीचे पितळ उघड करण्यासाठी उच्च न्यायालयात येत्या आठवडाभरात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती शिवाजी राऊत यांनी दिली आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |