कराड : नागरी बँका व पतसंस्थांना थकीत कर्ज वसुलीसाठी पोलीस संरक्षण देण्यासाठी शासनाने दि. 29 जानेवारी 2019 रोजी परिपत्रक जारी केले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगांवकर यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजीत पत्रकार परिषदेत ते आज (बुधवारी) बोलत होते. ते पुढे म्हणाले, नागरी बँका व पतसंस्थांमध्ये कर्ज वितरण केल्यावर काही खाती थकीत जातात. या खात्यांवर विविध कायद्यांतर्गत संबधीत सहकारी संस्था कर्जदाराविरूद्ध वसुली दावे दाखल करतात. वसुलीचे दाखले संबधीत बँक अथवा पतसंस्थांना प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष तारण मिळकतीची जप्ती व विक्री करीत असताना बर्याचवेळा कर्जदारांकडून अडचणी निर्माण केल्या जातात व वसुली प्रक्रियेमध्ये दिरंगाई होते. यावर उपाय म्हणुन सहकारी संस्थांनी सहकार खाते, गृहखाते यांच्याकडे वेळोवेळी वसुली दरम्यान पोलीस संरक्षण देण्याची कार्यवाही करावी अशी मागणी केली होती.
सहकार भारती या सहकार क्षेत्रात काम करणार्या विश्वस्थ संस्थेने बँक्स व पतसंस्थांचे फेडरेशन्स्, असोसिएशन्स यांनी देखील विविध अधिवेशनाच्या व निवेदनांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेकडे यासंदर्भात मागणी केली होती. या सर्वांचा परिणाम बँकेने देखील शासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचीका दाखल केली होती. या सर्वांचा परिणाम म्हणून सरफेसी ऍक्ट 2002 मध्ये सेक्शन 14 अंतर्गत बँका व पतसंस्थांच्या वसुली व जप्तीच्या कारवाई दरम्यान पोलीसांकडून बंदोबस्त पुरवण्यासंदर्भात दिनांक 29 जाने 2019 शासनाने परिपत्रक जारी केेले आहे. यामुळे आता नागरी बँका व पतसंस्थांना वसुलीकामी पोलीस बंदोबस्त मिळणे सुकर झाले आहे असे ना. चरेगांवकर यांनी सांगितले.
सहकारी संस्थांनी मागणी केल्यावर त्वरीत संरक्षण देण्याची कार्यवाही करावी असे आदेश या परिपत्रकाच्या माध्यमातून पोेलीस खात्यास देण्यात आलेले आहेत. नागरी बँका व पतसंस्थांनी पोलीस संरक्षणाची मागणी केल्यावर पोलीसांमार्फत कागदपत्रांची फेर तपासणी करण्यात येत होती. यामध्येही नाहक वेळ जात होता. या परिपत्रकामध्ये पोलीसांनी कागदपत्रांची फेरतपासणी करू नये असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
बँका व पतसंस्थंानी बंदोबस्ताची मागणी किमान 15 दिवस आधी करावी. जप्तीची कारवाई शक्यतो सुर्योदय ते सुर्यास्ता दरम्यान करावी व त्याचे व्हिडीओ शुटींग करून ते जतन करावे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असेही नमुद केलेले आहे. तसेच बँका व पतसंस्थंानी बंदोबस्तासाठी मागणी केल्यावर पोलीस खात्याने संबधीत बंदोबस्तांचे शुल्क जमा करून ते शासकीय तिजोरीत जमा करावेत असेही म्हंटले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |