03:55pm | Dec 13, 2019 |
सातारा : पारधी समाजाच्या मागण्यांबाबत अनेकवेळा निवेदन देवूनसुध्दा प्रशासन दखल न घेतल्याने बेमुदत धरणे आंदोलन करण्याची वेळ आली. पारधी समाजाच्या मागण्याबाबत गांभीर्याने दखल घेवून त्यांना न्याय देण्याची भूमिका प्रशासनाने घेण्याची गरज असून आमच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, तसेच निरगेल शिंदे यांना केलेल्या अमानूष मारहाणीची चौकशी करुन पोलीस निरीक्षक पाटील यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कृती समिती व फकिरा बिग्रेडचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केली आहे.
विविध मागण्यांसाठी कृती समिती व फकिरा बिग्रेडच्या नेतृत्वाखाली पारधी समाजातील नागरिक, महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. यावेळी जिल्हाधिकाऱयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पारधी समाजाला मुख्य प्रवाहाशी जोडून घेऊन त्यांचे जगणे सुसहय करण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. मात्र त्यांना जिल्हा प्रशासनाकडून न्याय मिळत नाही.
खटाव तालुक्यातील कुरोली येथे निरगेल लक्ष्मण शिंदे, पुसेगाव येथील शालन शिंदे व त्यांचे कुटुंब गेल्या अनेक वास्तव्य करीत आहेत. मात्र त्यांना आजही शासनाच्या सवलती मिळालेल्या नाहीत. खटावचे तहसिलदार आणि प्रांत यांना अनेक वेळा निवेदने देवून सुध्दा गांभिर्याने दखल घेतली नसल्याने हे आंदोलन करण्याची वेळ आली आहे. तसेच वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पाटील व त्यांचे सहकारी यांनी निरगेल शिंदे यांना कुरोली येथील भर चौकामध्ये अमानुषपणे मारहाण केली आहे. याबाबत निरगेल शिंदे यांनी स्वतः फिर्याद देण्यास वडूज पोलीस ठाणे येथे गेले असता त्यांची फिर्याद घेतलेली नाही. पाटील व त्यांच्या सहकाऱयांवर ऍट्रासिटी ऍक्टखाली गुन्हा दाखल करण्यात यावा.
जिह्यातील संपूर्ण पारधी समाजाचे पुनर्वसन करण्यात यावे, पारधी समाजावर टाकलेले खोटे गुन्हे काढून घेण्यात यावेत, पारधी समाजाला घरकूल व जातीचे दाखले तात्काळ द्यावेत अन्यथा या मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढून आत्मदहन करु, असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे. या आंदोलानात पारधी समाजातील महिला व नागारिकांसह रुपिता पवार, संजय बाबर, उत्तम अवघडे, निरगेल शिंदे सहभागी झाले आहेत.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |