09:38pm | May 27, 2018 |
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ सबका विकास’या विचारधारेनुसार दिव्यांगांचे जीवन सुखी करण्यासाठी आम्ही व आमचे सर्व कार्यकर्ते काम करत आहोत.दिव्यांगांचे अश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावर हासू फुलले पाहिजे हे पं.दीनदयाळ यांचे अंत्योद्याचे तत्व मनापासून स्वीकारून आमचे काम सुरु आहे,असे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांनी केले.
चिंचवड येथील साई उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक अधिकारिता शिबिरात दिव्यांग बंधू व भगिनींना विविध साहित्यांचे वाटप केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी खासदार अमर साबळे बोलत होते.यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट,आ.लक्ष्मण जगताप,आ.महेश लांडगे,महापौर नितीन काळजे,उपमहापौर शैलजा मोरे,सत्तारूढ गटनेते एकनाथ पवार,स्थायी अध्यक्षा ममता गायकवाड ,सर्व नगरसेवक,पदाधिकारी,मनपा अधिकारी,विविध बँकांचे अधिकारी,दिव्यांग व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
खासदार साबळे म्हणाले,या शिबिरात केंद्र सरकारकडून मिळालेल्या ७६ लाख आणि माझ्या खासदार निधीतून १ लाख ४४ हजार अशा या निधीतून ३११ दिव्यांग बंधूंना विविध साहित्यांचे वाटप करण्यात येत आहे. नैसर्गिक किंवा दुर्घटनेत अपंगत्व आलेल्या दिव्यांग बंधूंनी आपल्यावर आलेल्या या संकटांना सामोरे कसे जायचे व सुखी जीवन कसे जगायचे याचा आदर्श घालून दिला आहे.त्यांचा हा आदर्श समोर ठेऊन इतरांनी जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करावा. सर्वसामान्य माणूस सुखी होणार नाही तो पर्यंत माझे सरकार त्यांना समर्पित आहे,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगत असल्याची माहिती खा.साबळे यांनी यावेळी आवर्जून दिली.
नैसर्गिक किंवा दुर्घटनेत आलेले अपंगत्व यांच्याशी संघर्ष करत करत आपण सुखी जीवन जगण्याचा प्रयत्न करता ते खरच कौतुकास्पद आहे,असे सांगून खासदार साबळे म्हणाले,दुर्देवाने जेव्हा जेव्हा राज्यात दुष्काळ पडतो तेव्हा शेतकरी अडचणीत येतो आणि तो आत्महत्येचे पाऊल उचलतो.दिव्यांगा प्रमाणे तो आलेल्या संकटाला सामोरे जाऊ शकत नाही.दिव्यांग बंधूंने अपंगत्वाला कंटाळून आत्महत्या केल्याचे उदाहरण महाराष्ट्रात नाही.म्हणून इतरांनी दिव्यांग बंधूंचा आदर्श घ्यावा आणि आपले जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करावा.पंतप्रधान मोदी व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला हे तुमचे जीवन सुखी करण्यासाठी तुमच्या पाठीशी सदैव उभे आहेत,त्यांच्या विचारधारेनुसार आम्ही काम करता आहोत,असे खा.साबळे यांनी सांगितले.
बँक अधिकाऱ्यांनी मुद्रा कर्ज योजने अंतर्गत युवकांना उद्योग उभारण्यासाठी अर्थ सहाय्य करावे.त्यांचे जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न करावा.भूख लागते ही प्रकृती आहे,भूखे पेक्षा जास्त खाणे ही विकृती आहे आणि भूख लागली असतानाही अर्धवट उपाशीपोटी राहून आपल्या ताटातील घास दुसऱ्याला भरविणे ही आपली संस्कृती आहे.म्हणूनच पिंपरी-चिंचवड मनपा श्रीमंत असूनही शहरातील दिव्यांगाना २ हजार रुपये अर्थ सहाय देत आहे ,ही खरी श्रीमंती आहे,हीच खरी संस्कृती आहे, असे मला वाटते,असेही खासदार साबळे म्हणाले.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |