05:50pm | Nov 19, 2019 |
सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 च्या सातारा-पुणे महामार्गाच्या झालेल्या दुर्दशेप्रकरणी तसेच जाचक टोल संदर्भात जिल्हा प्रशासनाने बोलविलेल्या बैठकीला जिल्ह्यातील प्रसारमाध्यमकर्मींना ‘नो एन्ट्री’ दिल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, जिल्ह्यातील लोकांना लुटणार्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांना मात्र जिल्हा प्रशासनाने रेड कार्पेट टाकल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 च्या सातारा-पुणे महामार्गाच्या झालेल्या दुर्दशेबाबत सातारा-जावलीचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी खासदार उदयनराजे भोसले तसेच सातार्यातील टोल विरोधी चळवळीतील कार्यकर्त्यांनी याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच रिलायन्सला वारंवार अल्टिमेटम देवून एकतर रस्ते चांगले करा, अथवा आनेवाडी व खेड शिवापूर येथील टोल हटवा, असे बजावले होते. या संदर्भात टोल विरोधी चळवळीतील कार्यकर्त्यांनी व आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची पुण्यात भेट घेवून राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 च्या दुर्दशेचा पाढा वाचला होता. सुमारे आठवडा उलटूनही यासंदर्भात कोणत्याही प्रकारची हालचाल न झाल्याने आज आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या बैठकीला टोल विरोधी चळवळीतील कार्यकर्ते, प्राधिकरणाचे अधिकारी, निवासी उप जिल्हाधिकारी व स्वत: शिवेंद्रराजे उपस्थित होते. बैठकीला सुरुवात झाल्यानंतर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितले. वास्तविक पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 च्या दुर्दशेबाबत प्रसारमाध्यमांनी सातत्याने आवाज उठवला आहे. तसेच टोल विरोधी चळवळीला बळ देण्याचे कामही जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांनी केलेले आहे. असे असताना सातारा जिल्हाधिकार्यांनी प्रसारमाध्यमकर्मींना सापत्नभावाची वागणूक दिली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणार्या प्रसारमाध्यमांचा अशाप्रकारचा पाणउतारा जिल्हाधिकार्यांनी केल्यामुळे अनेक माध्यमकर्मींनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, आज बैठकीला पत्रकारांना उपस्थित न राहू दिल्यामुळे बैठकीतील तपशील अद्याप समजू शकला नाही. परंतू नेहमीप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘संजय’ म्हणून ओळखल्या जाणार्या सातारा जिल्हा माहिती अधिकार्यांकडून या संदर्भातील बातमी पाठवली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |