कराड : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या सरकारने राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्याबरोबरच केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहचलेली आहेत. त्यामुळे पुन्हा भाजपा शिवसेना महायुतीचेच सरकार सत्तेमध्ये येणार आहे. भाजपा सरकारची ही विकासाची दृष्टी पाहून कराड दक्षिणच्या जनतेने आता परिवर्तन घडविण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले. कालवडे (ता. कराड) येथील जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते.
व्यासपीठावर ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, कृष्णा सहकारी बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, कराड कराड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनिल पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितिन काशिद, कृष्णा कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब पाटील, विवेक पाटील, डॉ. सारिका गावडे, व्ही. के. मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून राज्यात सिंचन, कृषी, आरोग्य, रोजगार निर्मितीसाठी ठोस उपाययोजना राबविल्या आहेत. येत्या काळात विकासाची ही गंगा कराड दक्षिणमध्ये गतिमान करण्यासाठी भाजपाला साथ द्यावी.
मदनराव मोहिते म्हणाले, अतुलबाबांनी गेल्या 5 वर्षामध्ये दक्षिण मतदारसंघात केलेले कार्य लक्ष वेधून घेणारे आहे. सत्तापद नसताना त्यांनी एवढा निधी आणला; आमदार झाल्यावर याच्या पाचपट निधी ते भाजपा सरकारच्या माध्यमातून आणतील. त्यामुळे यावेळी सर्वांनी मिळून अतुलबाबांना आमदार करुया, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सुनिल पाटील म्हणाले, भाजपा सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिण मतदारसंघामध्ये विविध विकासकामे सुरु आहेत. अतुलबाबांच्या प्रयत्नातून या मतदारसंघामध्ये भाजपा सरकारने कोट्यावधींचा निधी दिला आहे. अशा या कर्तृत्ववान नेतृत्वास काम करण्याची संधी मतदारसंघातील सुज्ञ जनतेने दिली पाहिजे. डॉ. अतुलबाबा या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलतील.
यावेळी डॉ. अमोल मोटे, विष्णू थोरात, दादासो थोरात, रतन थोरात, तात्यासो थोरात, मारुती थोरात, संपत तडाखे, जयकर माने, सुहास गाडे, सिकंदर जाधव, भानुदास शिंदे, प्रशांत गाडे, आनंदा गाडे यांची उपस्थिती होती.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |