सातारा : काळोशी पो. अंबवडे ता. सातारा येथे प्रेमी युगुलाने प्रेमविवाह केल्यानंतर चिडलेल्या मुलीच्या कुटुंबिय, नातेवाईकांनी मुलाच्या कुटुंबियांना कुर्हाड, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याने खळबळ उडाली आहे. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या घटनेने गावात तणावाचे वातावरण असून सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लक्ष्मण लामजे, सुरज लामजे, पंकज लामजे, ऋषिकेश शेलार, अनिकेत डफळ, प्रवीण लोंढे यांच्यासह 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अमोल उत्तम निकम रा. काळोशी यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदारासह चौघे जखमी असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार यांच्या भावाने संशयित लक्ष्मण लामजे यांच्या मुलीशी प्रेमविवाह केला आहे. या घटनेची माहिती लामजे कुटुंबिय व नातेवाईकांना समजल्यानंतर बुधवारी रात्री अकरा वाजता संशयितांनी कुर्हाड, लाकडी दांडक्याने निकम कुटुंबियांवर हल्ला चढवला. या घटनेने निकम कुटुंबिय हादरुन गेले असून हल्ल्यात एका महिलेसह चौघेजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणल्यानंतर घटनेची माहिती समोर आली. दरम्यान, जखमींनी प्रेमविवाह करण्यास पाठींबा दिल्याने चिडून मारहाण झाली केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सातारा तालुका पोलिसांनी रुग्णालयात व घटनास्थळी धाव घेवून परिस्थिती आवाक्यात आणली. रुग्णालयातून तक्रार दिल्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून तालुका पोलिस पुढील तपास करत आहेत.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |