12:24am | May 13, 2019 |
कराड : मांडूळ तस्करीसाठी आलेल्या दोघांना तालुका पोलिसांनी रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मालखेड (ता. कराड) येथील सम्राट लॉजसमोर सापळा ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे 30 लाख रूपये किमतीचे एक रेड सॅण्डबो जातीचे मांडूळ व एक दुचाकी, असा सुमारे 30 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पांडुरंग भगवान शिंदे (वय 34), जयवंत शंकर ताटे (वय 33, दोघेही रा. कासेगाव ता. वाळवा, जि. सांगली), अशी मांडूळ तस्करीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मालखेड (ता. कराड) गावच्या हद्दीतील सम्राट लॉज परिसरात दोघेजण मांडूळ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर यांना खबर्याकडून मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक भापकर व पोलीस हवालदार म्हेत्रे यांनी मालखेड येथील सम्राट लॉज परिसरात सापळा रचला. सायंकाळी पाचच्या सुमारास पांडुरंग शिंदे व जयवंत ताटे हे डिस्कव्हर गाडीवरून आले. त्यांच्या गाडीला एक पिशवी अडकवलेली होती. पोलिसांना त्यांचा संशय आल्याने पोलिसांनी संशयीतांकडील पिशवी उघडून पाहिले असता पिशवीत असलेल्या डब्यात एक काळपट रंगाचे सुमारे 30 लाख रूपये किंमतीचे 64 से. मी. लांबीचे आणि 8 सेमी जाडीचे मांडूळ आढळून आले. मांडूळाची विक्री करण्यासाठी आलो असल्याची कबुलीही संशयीतांनी दिली. त्यामुळे पांडुरंग शिंदे व जयवंत ताटे या संशयीतांना पोलिसांनी पंचांसमक्ष ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
उपअधीक्षक नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर, पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, पोलीस हवालदार म्हेत्रे यांनी ही कारवाई केली. याकामी नांदगावचे वनरक्षक योगेश पाटील यांनी मांडूळाची ओळख पटविण्यास मदत केली. उपनिरीक्षक राजू डांगे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |