सातारा : मुंबई येथून सज्जनगडावर फिरण्यासाठी आलेल्या एका प्रेमी युगलानी आज बुधवार दि. 14 रोजी दुपारच्या वेळी गडावरून 300 ते 400 फूट खोल दरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या युगलाची नावे पूनम मोरे आणि तिचा प्रियकर अंकुश मोरे अशी नावे आहेत. हे दोघेही पाटण तालुक्यातील आहेत.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की, पूनम मोरे आणि निलेश मोरे यांचे प्रेम संबंध होते. निलेश हा पूनमच्या नात्यातील आहे. पूनमला देवराज हा लहान मुलगा आहे. मुंबई येथून पूनम मोरे ही गेल्या तीन दिवसांपासून हरवली असल्याची तक्रार तिच्या पतीने नोंदवली होती. नंतर पूनमचा मोबाईल ट्रॅक केल्यानंतर ती सातारला असल्याचे समजले. तिचा नवरा तिचा शोध घेत सातारला आला होता. सज्जनगड येथे हे दोघेही बुधवारी फिरायला आले होते. सध्या दीपावली सुट्टीचा हंगाम असल्याने सज्जनगडावर रामदास स्वामींच्या समाधीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी आहे. पूनमने सोबत तिचा 5 वर्षाचा मुलगा देवराज यालाही बरोबर घेऊन आली होती. पूनम हिने मुलगा देवराज याला बसवून ती प्रियकर निलेश सोबत गेलीसकाळी ११ वाजण्याच्या सुमारास 300 ते 400 फूट खोल दरीत उडी मारून जीवन यात्रा संपवली.
ही वार्ता सज्जनगडावरील मारुती मंदिराच्या बाजूस असलेल्या एका पॉईंटवरुन दांपत्याने उडी मारल्याची घटना समोर आली. त्यानंतर गडावरील संस्थानच्या सुत्रांनी ही खबर सातारा तालुका पोलीस ठाण्यात कळवली. घटनेची खबर कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव जाधव यांनी सहकाऱयांसमवेत घटनास्थळी धाव घेतली. प्रारंभी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह दरीतून वर काढण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले. हे प्रयत्न सुरु असतानाच एक लहान 5 वर्षांचा मुलगा संस्थानच्या कार्यालयात बसवून ठेवण्यात आला होता. तो या दांपत्याबरोबर होता. मात्र त्याने आईबरोबर आल्याचे सांगत होता. दुसरे कोण होते याची माहिती तो नीट देवू शकत नव्हता. तोपर्यंत खाली पोहोचलेल्या ट्रेकर्सकडून युवकाच्या मृतदेहावरील पँटीच्या खिशात आधारकार्डवर त्याचे नाव निलेश अंकुश मोरे असल्याचे व तो भुडकेवाडी वरची, ता. पाटण या गावाचा असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी वरची भुडकेवाडी सरपंचांना ही माहिती दिली.
दुपारी 2 वाजेपर्यंत मृतदेह काढण्यात यश आले नव्हते. वाघवाडीच्या दिशेला असलेल्या खोल दरीतून हे मृतदेह काढण्यासाठी तोपर्यंत महाबळेश्वर ट्रेकर्सचे कुमार शिंदे व राहूल तपासे यांची टीम घटनास्थळी पोहोचली. या टीमने अद्यावत यंत्रणेसह मदतकार्य सुरु केल्याने दुपारी 4 वाजेपर्यंत पहिल्यांदा निलेश अंकुश मोरे वय 26 युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. युवकाचा भाऊ तिथे आला होता त्यामुळे लगेच ओळखही पटवण्यात आली. त्यानंतर सौ. पूनम अभय मोरे वय 27 हिचा मृतदेह दरीतून वर काढण्यात आला. तिचा पती अभय याने ही आपली पत्नी असल्याचे ओळखल्यानंतर सातारा तालुका पोलिसांनी पंचनामा केला. त्यानंतर सायंकाळी 5.30 च्या सुमारास मृतदेह पोस्टमार्टेमसाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर रात्री उशिरा नेत त्यांच्या भुडकेवाडी वरची, ता. पाटण गावातील नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |