12:50am | Aug 14, 2018 |
सातारा : सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असणार्या पंताचा गोट येथे रविवारी रात्री एका अज्ञाताने महिलेला चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, महिलेने आरडाओरडा केल्यानंतर संशयित चोरटा पळून गेला.
रेखा विजय महाडीक (वय 65, रा.पंताचा गोट) यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार घरातील कामे उकरत होत्या. यावेळी दाराची बेल वाजल्याने त्यांच्या नातीने दरवाजा उघडला. यावेळी संशयित तोंडाला रुमाला बांधून हातात चाकू घेवून उभा राहिला होता. दरवाजा उघडताच संशयिताने चाकूचा धाक दाखवून तक्रारदार महिलेला अंगावरील, घरातील दागिने व रोख रक्कम काढून देण्यासाठी दमदाटी केली. या घटनेने महिलेने स्वत: बचाव करत आरडाओरडा केला. महिला व नातीचा आरडाओरडा झाल्याने संशयिताने भितीपोटी तेथून पळ काढला.
यावेळी परिसरातील नागरिक घटनास्थळी आल्यानंतर घडलेल्या घटनेबाबत त्यांना माहिती देण्यात आली. काही नागरिकांनी संशयिताचा पाठलग करण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत तो संशयित पळून गेला होता. शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी अज्ञातविरुध्द गुन्हा दाखल केला. दरम्यान, पोलिस ठाण्याच्या नजीकच अशी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |