कराड : आठवडाभरापूर्वी कराड-विटा मार्गालगत राजमाची (ता.कराड) किल्ले सदाशिवगड परिसरातील जानाई मंदिरलगत असणार्या पोपट बापू यांच्या क्रशर परिसरात सीसीटीव्ही कॅमेर्यात बिबट्या कैद झाला. ही घटना ताजी असतानाच शनिवारी पहाटे किल्ले सदाशिवगड बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्या आपल्या चार पिल्लांसह या परिसरात वावरत असल्याचेही परिसरातील काही लोकांचे म्हणणे आहे.
स्वराज्यात अन्ययसाधारण महत्त्व असलेल्या ऐतिहासिक सदाशिवगड परिसरातील राजमाची येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. बिबट्या चार पिल्लांसह वास्तव्यास असल्याचे बोलले जात होते. मात्र तीन जानेवारीला प्रथमच बिबट्या पोपट बापू यांच्या क्रशर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला होता. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बिबट्या या कॅमेर्यात कैद झाल्यानंतर शनिवार, 12 जानेवारीला पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाले. कराड अर्बंन बँकेंचे उपाध्यक्ष समीर जोशी हे आपले सहकारी बिपीन पाटील यांच्यासोबत नेहमीप्रमाणे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सदाशिवगडावर पोहचले होते. गडावरील महादेव मंदिरात दर्शन घेतल्यानंतर गडावर राजमाची बाजूकडे असणार्या बुरूंजाकडे ते चालत निघाले होते. त्याचवेळी या परिसरात बिबट्या दबा धरून बसल्याचे त्यांना दिसून आले. मंदिर परिसरातील तीन ते चार कुत्रीही जोशी यांच्यासोबत होती. मात्र बिबट्याची चाहूल लागताच कुत्र्यांनी तेथून धूम ठोकली. तर समीर जोशी आणि पाटील यांनी मोठ्या धाडसाने बिबट्याच्या तोंडावर बॅटरीचा प्रकाशझोत टाकला. त्यानंतरही सुमारे दहा मिनिटे बिबट्या त्याच परिसरात होता. जोशी आणि पाटील यांनी तेथून न हटता प्रकाशझोत सुरूच ठेवल्याने अखेर बिबट्याने तेथून काढता पाय घेतला. त्यामुळेच आता सदाशिवगड परिसरात बिबट्याचा दर्शन झाले असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |

लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |