सातारा : सहा कोटी रुपयांचे कर्ज देतो असे सांगून पाच जणांनी 31 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचा गुन्हा शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. संशयितांमध्ये एका वकीलाचा व दोन महिलांचा सहभाग आहेे.
आदित्य शशांक माने, अॅड. शशांक सखाराम माने, आदित्य माने याची आई (तिघे रा. पेठ नाका ता.वाळवा, सांगली), संजय राघू नवले (रा.गोंदवले ता.माण), माधवी जवळकर (रा.खंडाळा) या संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी रोहिदास ज्ञानदेव राजपुरे (वय 38, रा. पाचगणी ता.महाबळेश्वर) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील काही संशयित तक्रारदार यांच्या ओळखीचे आहेत. या ओळखीतूनच तक्रारदार यांना कर्ज पाहिजे असल्याने संशयितांनी ते कर्ज देतो असे सांगितले. फेब्रुवारी 2017 पासून तक्रारदार संशयितांना सातार्यात वेळोवेळी भेटले आहेत. यातील आदित्य माने हा बँकेचा कर्ज वितरण अधिकारी असल्याचे संशयितांनी भासवले व तशी खोटी कागदपत्रेही तयार केली. यासाठी विविध प्रोसेसिंग फी म्हणून संशयितांनी 31 लाख 75 हजार रुपये घेतले.
पैसे भरुनही कर्ज मिळत नसल्याने तक्रारदार यांनी संशयितांकडे तगादा लावला. मात्र संशयितांनी त्याकडे टाळाटाळ करुन उलट तक्रारदार यांना धमकवण्यास सुरुवात केली. यामुळे अखेर तक्रारदार यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |