सातारा : दहावीच्या परीक्षेचा सातारा जिल्ह्याचा निकाल ८६.२३ टक्के लागला असून यशस्वी परीक्षार्थीमध्ये नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.
सातारा जिल्ह्यातील ७१४ माध्यमिक शाळांमधील सुमारे ४२ हजार ९२० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यातील ३६ हजार ७६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुनःपरीक्षार्थी म्हणून दहावीच्या परीक्षेला सामोरे गेलेल्या १ हजार १०२ विद्यार्थ्यांपैकी केवळ २९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हे प्रमाण २७.०४ टक्के आहे.
जिल्ह्यात २२ हजार ७५१ विद्यार्थ्यांची नोंद झाली. त्यापैकी दहावीच्या परिक्षेसाठी २२ हजार ५७४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले. त्यांच्यापैकी १८ हजार ४६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर २० हजार १६९ विद्यार्थीनींची नोंद झाली आहे. त्यातील २० हजार ५६ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले. यंदा मुलींच्या तुलनेत मुलांचा उत्तीर्ण होण्याचा टक्का अवघा ८१. ८० तर मुलींचा उत्तीर्ण होण्याचा टक्का ९१. २२ टक्के इतका आहे. मार्च २०१८ चा तुलनात्मक निकाल ९३.८८ टक्के इतका आहे. त्या तुलनेत यंदा ८६.५८ टक्के निकाल लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ७.३० टक्के घट झाली आहे.
कॉपी मुक्त परिक्षांसाठी जिल्हा परिषदेच्यावतीने विशेष मोहीम आखली होती. दुर्गम भागातही फिरते पथक ठेवून त्या पथकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर करडी नजर ठेवण्यात आली होती. याविषयी शाळांमध्ये आधीच वातावरण निर्मितीही करण्यात आली होती. एक वेळची कॉपी पुढील शैक्षणिक वर्षासाठी त्रासदायक ठरेल ही भूमिका वारंवार सांगण्यात आल्याचा परिणाम यंदा परिक्षेच्या काळात दिसून आला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा हे प्रमाण घटलेले दिसत आहे. याबरोबरच परिक्षेच्या आधी अर्धा तास वर्गात दाखल होण्याची कडक भूमिका प्रशासनाने घेतल्याचा सकारात्मक परिणामही विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर दिसून आला.
दहावीची परिक्षा देणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांविषयी साशंकता आहे, त्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी १० जूनपासून अर्ज करता येईल.
परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या किंवा श्रेणी सुधारण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना जुलै-आॅगस्टमध्ये फेरपरीक्षेची संधी मिळणार आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |