मानदुखीचा त्रास होत असणार्यांनी काही घरगुती उपाय केल्यास त्यांना आराम मिळू शकतो. त्याच बरोबर आपण मानेचे व्यायामही करू शकतो. मानदुखीवर त्याची तीव्रता वाढण्याआधी उपाय केले पाहिजेत. मानदुखी ही सध्याच्या आधुनिक जीवनशैलीचा परिपाक आहे. हल्ली मानदुखी झालेल्या व्यक्तींचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मान हा आपल्या शरीराचा महत्वाचा घटक आहे. हा अवयव दुखावला गेल्यास आपल्याला वेदना सहन कराव्या लागतातच त्याबरोबरच आपल्या अन्य अवयवांच्या कार्यावरही त्याचा परिणाम होतो, असे दिसून येते.
आपल्या शरीराचे कार्य व्यवस्थित चालू राहण्यासाठी मानेचे आरोग्य जपणे महत्त्वाचे असते. मानेचे आरोग्य बिघडले की, आपल्या डोक्याच्या हालचालींवर परिणाम होतो. त्याचबरोबर आपल्या पाठ, हात या अवयवांच्या कार्यावरही परिणाम होऊ शकतो. आपल्याला दररोजची कामे करणे अवघड होऊन बसते. आपल्याला मान वळवून इकडे तिकडे पाहता येत नाही. या व्याधीवर योग्य उपचार झाले नाहीत तर आपल्याला असह्य वेदना सहन कराव्या लागतात. मान दुखीमुळे डोकेदुखी सुरू होते. मानेच्या आजूबाजूला असलेल्या अवयवांचे कार्य बिघडते. आपल्या मानेजवळ असलेल्या स्नायूंना बधीरपणा येतो, मुंग्या येऊ लागतात. मानदुखी अनेक कारणांमुळे निर्माण होते. मुख्य कारण म्हणजे मानेतील स्नायूंवर आलेला ताण. आपण काम करीत असताना खुर्चीत चुकीच्या पद्धतीने बसत असू तर त्याचा परिणामही मानदुखीत होऊ शकतो. बराच वेळ कॉम्प्युटरसमोर काम करणे, झोपताना चुकीच्या पद्धतीने झोपणे यासारख्या कारणामुळेही मानदुखीची व्याधी उद्भवते. व्यायाम करीत असताना मानेला झटका बसल्यास त्याचा परिणामही मानदुखीत होऊ शकतो. काही पौष्टिक घटकांच्या कमतरतेमुळेही मानदुखीचा त्रास सुरू होतो. पाठीच्या कण्याला संसर्ग झाल्यामुळेही मानदुखी होऊ शकते. या व्याधीवर आपल्याला काही घरगुती उपाय करता येतात.
* मानेवर आईस पॅक ठेवणे हा मानदुखी वर चांगला उपाय समजला जातो. बर्फामुळे आपल्या मानेजवळील अनेक स्नायूंचे अवघडलेपण कमी होते आणि त्या स्नायूंचे कार्य सुरळीत चालू राहण्यास मदत होते. बर्फामुळे मानेच्या वेदनांची तीव्रता कमी होण्यास मदत होते. त्यासाठी एका प्लास्टिक पिशवीत बर्फाचे बारीक केलेले तुकडे भरून घ्या. ही पिशवी एका टॉवेलमध्ये गुंडाळून घ्या. आता हा टॉवेल आपल्या मानेवर 15 मिनिटे ठेवा. दिवसात दोन-तीन तासांनी एकदा याप्रमाणे हा आईस पॅक ठेवणे आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे ती म्हणजे आपल्या मानेवर बर्फ थेट ठेवू नका.
* मानदुखीवर हायड्रोथेरपी हाही चांगला उपचार समजला जातो. हा उपचार आपल्याला घरच्या घरी करता येऊ शकतो. आपली मान शॉवर खाली धरणे आणि जो भाग दुखतो आहे त्या भागावर पाणी घेणे. असे केल्याने आपल्या मानेतील आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते. जो भाग दुखत आहे त्यावर गरम पाण्याचा तीन ते चार मिनिटे मारा करावा. त्यानंतर गार पाण्याचा मारा 30 ते 60 सेकंदांकरिता करावा. अशा पद्धतीने कितीही वेळ आपण मानेवर पाण्याचा मारा करू शकतो. गरम पाण्यामुळे आपल्या शरीरातील रक्त प्रवाहाचा वेग वाढतो. त्याच बरोबर वेगवेगळ्या कारणांनी आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते. गार पाण्याने आपल्या वेदना कमी होतात.
* आंघोळ करताना पाण्यामध्ये सैंधव मीठ टाकल्यास त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो, असे दिसून येईल. सैंधव मिठामुळे मानेवर आलेला ताण दूर होऊ शकतो. सैंधव मिठामध्ये स्नायूंना मोकळे करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे आपल्या वेदना कमी होतात. गरम पाण्यात एक-दोन चमचे सैंधव मीठ घालून त्या पाण्याने आपल्या मानेला शेक द्या. 15 ते 20 मिनिटे शेक दिल्यास आपल्या मानेत आखडलेले स्नायू मोकळे होतात. ज्यांना हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह आहे, अशा व्यक्तींनी हा उपचार घेऊ नये.
* सफरचंदाच्या रसापासून बनविलेल्या व्हिनेगरचाही मानदुखीवर उपचार म्हणून उपयोग होतो. या व्हिनेगरमध्ये अँटी ऑक्सिडन्टस असतात. त्याच बरोबर आपल्या शरीराला ज्या पौष्टिक घटकांची कमतरता असते ते घटक पुरविण्याची क्षमता या व्हिनेगरमध्ये असते. या व्हिनेगरमध्ये टॉवेल भिजवून घ्यावा आणि हा टॉवेल आपल्या मानेच्या दुखर्या भागावर ठेवावा. तासभर तरी हा टॉवेल मानेच्या दुखर्या भागावर ठेवावा. दिवसातून दोन वेळा असे केल्यास आपल्या मानदुखीची तीव्रता कमी झाल्याचे आढळून येईल.
* मानेचे वेगवेगळे व्यायाम करूनही आपल्याला मानदुखी दूर करता येऊ शकते. मान क्लॉकवाईज आणि अॅन्टी क्लॉकवाईज फिरवत रहा. त्याचबरोबर मान उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला झुकवून ठेवा. या पद्धतीने आपल्या मानेचे आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते. त्याचबरोबर मान पुढील बाजूला आणि मागील बाजूला झुकवण्यानेही मानेला चांगला आराम होतो. सुरुवातीला हे व्यायाम करताना आपली मान काहीशी दुखेल. मात्र, सराव झाल्यानंतर आपल्याला मानदुखीची तीव्रता कमी झाल्याचा अनुभव येतो.
* लव्हेंडर फुलांपासून बनवलेल्या तेलाचा मानदुखी कमी करण्यासाठी उपयोग होतो, असे दिसून आले आहे. या तेलाने आपल्या मानेला मसाज केल्यास ताणलेले स्नायू मोकळे होऊ लागतात. आंघोळीवेळी कडक गरम पाण्याने आपल्या मानेला शेक द्या. आंघोळ झाल्यानंतर आपल्या मानेला आणि खांद्यांना लव्हेंडर तेल चोळा. जो भाग दुखत आहे त्या भागाला या तेलाने हलका मसाज करा. दोन-तीन वेळा अशा पद्धतीने या तेलाचा मसाज मानेला करावा.
* आपल्या शरीराला काही पौष्टिक घटकांची कमतरता असल्याने मानदुखीची समस्या जाणवत असेल तर आपण काकवी आपल्या आहारात नियमित समाविष्ट केली पाहिजे. काकवीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम यांचे प्रमाण भरपूर असते. दररोज एक चमचा गरम पाण्यात काकवी घालून घ्यावी.
* एक चमचा हळद पावडर एक ग्लास दुधामध्ये घालावी. हे मिश्रण काही मिनिटे गरम करावे. नंतर त्यात थोडा मध घालावा. थंड झाल्यानंतर हे मिश्रण घ्यावे. दिवसातून दोन वेळा हे मिश्रण घ्यावे.
* आल्याचे बारीक तुकडे करून घ्या. हे तुकडे दोन कप पाण्यात घालून ते चांगले गरम करा. त्यात थोडा मध टाकून हे मिश्रण प्या. त्याचबरोबर पाण्यात दररोज सुंठ पावडर टाकून दररोज पिल्यास त्याचाही फायदा होतो.
* मिरपुडीमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे मानदुखीवर मिरपूड उपयुक्त ठरते. एक चमचा मिरपूड दोन चमचे ऑलिव्ह तेलामध्ये घाला. हे मिश्रण चांगले ढवळून काढा आणि दुखणार्या भागावर हे मिश्रण लावा.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |