नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे नेते उदयनराजे भोसले यांनी आज नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रावसाहेब दानवे, यांच्यासह राज्यातल्या तसेत केंद्रातल्या अनेक दिग्गजांची हजेरी होती.
पक्षप्रवेशानंतर उदयनराजे म्हणाले की, लोकांच्या हितासाठी मी हा भाजपप्रवेशाचा निर्णय घेतला आहे. पूर्णपणे निस्वार्थी भावनेने मी हे पाऊल उचलले आहे. मोदी-शाह देशाला विकासाच्या मार्गावर घेऊन जात आहेत, त्याचबरोबर त्यांनी लोकशाही मजबूत केली आहे. कलम 370 रद्द करण्याचा निर्णयदेखील याच सरकारने घेतला. त्यामुळे मी भारावून गेलो आहे.
गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या विचारातून भाजपचं कार्य सुरु आहे. त्यांच्या प्रेरणेतून काम सुरुच राहील. त्यामुळे आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा युतीचं सरकार येईल. आम्हाला बहुमतही मिळेल.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उदयनराजेंच्या भाजपमध्ये येण्यामुळे पक्षाला मोठा फायदा होणार आहे. उदयनराजे यांनी काल (13 सप्टेंबर) रात्री खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ते आता नव्याने निवडणूक लढून रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून येतील आणि पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेत जातील.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |