08:06pm | Mar 25, 2020 |
सातारा : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कालपासूनच संपूर्ण देशात संचार व जमावबंदी जाहीर करण्यात आली आहे. विनाकामी रस्त्यावर फिरणार्यांना पोलीस लाठ्यांचा प्रसाद देवून शिस्त लावत आहेत. मात्र काही ठिकाणी मात्र पोलिसांनीच कायदा हातात घेत कायद्याचा दुरुपयोग करण्यास सुरुवात केली आहे. अशीच घटना आज पळसावडे, ता. माण येथे घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पळसावडे, ता. माण येथे रहिवासी असलेला दत्ता अंकुश शेडगे हे गेल्या 18 वर्षापासून लष्करात कार्यरत आहेत. सध्या त्यांची नियुक्ती जम्मू कश्मिर येथील कुपवाडा येथे आहे. ते 14 मार्च रोजी कर्तव्य बजावून 30 दिवसांच्या सुट्टीला गावाकडे आलेले आहेेत. परवापासूनच राज्यात लॉक डाऊन करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येकाला घरातच राहण्याच्या सक्त सूचना देवून जिल्ह्यात संचार व जमावबंदी सक्तीने राबविण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. सातारा शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पोलिसांनी जमावबंदी व संचारबंदी आदेश झुगारुन रस्त्यावर फिरणार्यांना पोलीसी हिसका दाखवत हाताचा आणि लाठ्यांचा प्रसाद दिला जात आहे. परंतू काही पोलीस कर्मचारी मात्र कोरोनाच्या आडून आपली जुनी दुश्मनी उकरुन काढत हात धुवून घेत आहेत. आज दि. 25 रोजी सकाळी 10 वाजता लष्करातून सुट्टीवर आलेल्या आणि घराबाहेर उभ्या असलेल्या दत्ता अंकुश शेडगे या लष्करी जवानाला पोलिसांनी अक्षरश: बेदम मारहाण करीत बुकलून काढले. पोलिसांच्या या मारहाणीत ते जखमी झाले आहेत. त्यांच्या अंगावर ठिकठिकाणी मारहाणीचे व्रण उठले आहेत. माझी कुठलीही चुकी नसताना केवळ घराच्या दारात उभ्या असल्याच्या कारणावरुन पोलिसांनी मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत मारहाण केली आहे. देशाची सेवा करणार्या लष्करी जवानाबाबत पोलीस अशा पद्धतीने वागत असतील तर सामान्य लोकांशी ते कशा पद्धतीने वागत असतील, हा विचार न केलेला बरा. त्यामुळे मला मारहाण करणार्या पोलिसांवर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी लष्करी जवान दत्ता अंकुश शेडगे यांनी केलेली असून याबाबतचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर त्यांनी व्हायरल केला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |