सातारा : गेल्या काही दिवसांपासून सातारा शहर आणि परिसरात पावसाने जोर धरला आहे. सातार्याच्या पश्चिम भागातील यवतेश्वर परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळेच सातारा-कास रस्त्यावरील यवतेश्वर घाटात गुरुवारी सकाळी रस्ता खचला. त्यामुळे येथून वाहने चालवणे धोकादायक बनले आहे.
सातारा शहर आणि परिसरात खरेतर जून महिन्याच्या सुरुवातीसच पाऊस सुरु होतो. सह्याद्री पर्वत रांगांमुळे येथे तीनही ऋतु मोठ्या प्रमाणावर असतात. यावेळेस मात्र जून महिना सपल्यानंतर शहर आणि परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. या पावसामुळे परळी खोर्यात असणार्या सज्जनगड रस्त्यावर दरड कोसळली होती, तर आज यवतेश्वर घाटात रस्ता खचला आहे. यापूर्वी याच घाटात रस्ता खचला होता. त्यामुळे नागरिकांना फार त्रास सहन करावा लागला होता. यात विद्यार्थ्यांच्याही शिक्षणाचे फार मोठे नुकसान झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम पूर्ण केले होते. मागच्या वर्षाचा अनुभव लक्षात घेवून बांधकाम खात्याने यवतेश्वर घाटामध्ये सर्वेक्षण करुन खचणार्या भागाची दुरुस्ती करणे आवश्यक होते. परंतू तहान लागण्याआधी विहीर खणण्याइतके बांधकाम खाते सजग नाही. त्यानंतर या पावसाळ्यातही घाटातील रस्ता खचल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये प्रसिद्ध कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू होणार आहे. यासाठी पर्यटक मोठया प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळे खचलेल्या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |